Arushi Sharma Quit Acting Start Look Corporate Job Instagram/ @_arushisharma
मनोरंजन बातम्या

Arushi Sharma Quit Acting: प्रसिद्धी मिळूनही आरुषीचं का रुसलं होतं नशीब; सिनेसृष्टी सोडून का शोधू लागली होती नोकरी

Arushi Sharma News: इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटातून अभिनेत्री आरुषी शर्माने अभिनयाला सुरुवात केली. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिला प्रसिद्धी मिळाली. पण कोरोना महामारीमुळे तिला हाती काम मिळत नव्हतं.

Chetan Bodke

Arushi Sharma Quit Acting Start Look Corporate Job

हॉटस्टारवर रिलीज झालेल्या 'काला पानी' या वेबसीरीजमुळे आरुषी शर्मा चर्चेत आली होती. अभिनेत्री म्हणून आरुषीचा हा हा पहिला प्रोजेक्ट नव्हता. या आधीही तिने चित्रपटात काम केलेले आहे. त्या चित्रपटांमधून अभिनेत्रीला प्रसिद्धीही मिळाली. परंतू, कोरोनामुळे तिच्या आयुष्यातही 'काला पानी' सारखा अनुभव आला होता. इम्तियाज अलीच्या चित्रपटामध्ये काम करुन तिला प्रसिद्धी मिळाली होती. कोरोना महामारीमुळे तिच्या हाती काम मिळत नव्हतं. (Bollywood Actress)

खरंतर कोरोनाची झळ, देशातल्या प्रत्येक नागरिकाला बसली होती. सर्व व्यवसाय, उद्योगधंदे, चित्रपट मालिकांचे शुटिंग आणि इ... अशा सर्व गोष्टी ठप्प झाल्या होत्या. अनेकांना महामारीमुळे आपला जॉब गमवावा लागला होता. याचा फटका सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रींनाही बसला.

कोरोना काळापासून प्रेक्षकांचे चित्रपट पाहण्याचे माध्यम रुपेरी पडद्यावरुन ओटीटीकडे आले. ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा कल सर्वाधिक वाढला. ओटीटीने अनेक सेलिब्रिटींना ओळख प्राप्त करुन दिली. याच ओटीटीचा फायदा आरुषीला झाला. तिचं हे रुसलेलं नशीब परत तिच्यावर खुश झालं आणि परत तिला प्रसिद्धीझोतात आणलं. (Bollywood)

आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री आरुषी शर्मा हिला बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली. तिने २०१५ मध्ये रिलीज झालेल्या इम्तियाज अलीच्या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. पण तिला अभिनयाला सोडचिठ्ठी देत जॉब शोधण्याची तिच्यावर वेळ आल्याची माहिती तिने मुलाखतीतून दिली होती.

आरुषी शर्माने २०१५ मध्ये इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. रणबीर- दीपिका अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटामध्ये, आरुषी एका छोट्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटामध्ये तिने काम केले. पण त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे तिचे नशीबच पालटले. (OTT)

लॉकडाऊनपासून तिला एकही चित्रपट मिळाला नाही. अभिनय क्षेत्रामध्ये काहीच कामाची संधी नसल्यामुळे तिने एका इंजिनियरिंग कंपनीत जॉब शोधण्यास सुरुवात केली होती. याबद्दलचा खुलासा तिने एका मुलाखतीतून केला आहे. अनेक वर्षे चित्रपट किंवा वेबसीरीज मिळावा यासाठी संघर्ष केल्यानंतर, आरुषीने २०२२ मध्ये रिलीज झालेल्या जितेंद्र कुमारच्या ‘जादूगर’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली. पण त्या चित्रपटाला म्हणावा तसा प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण असं असलं तरी आरुषीच्या अभिनयाचे समीक्षकांसह प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच तोंडभरुन कौतुक केले. त्यासोबत बहुप्रतिक्षित ‘काला पानी’ या वेबसीरीजमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT