Gashmeer Mahajani To Trollers Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gashmeer Mahajani Post: 'केस कापले असते तर...', वडिलांच्या निधनानंतर टक्कल न केल्याबद्दल विचारणाऱ्या नेटकऱ्याला गश्मीरने चांगलंच झापलं

Gashmeer Mahajani Insta Story: गश्मीर महाजनीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'अस्क गश्म' हे सेशन केलं.

Pooja Dange

Gashmeer Mahajani Slam Netizens:

अभिनेता गश्मीर महाजनी त्याचे वडील जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर चर्चेत आहे. त्याला सर्वत्र टीकांचा सामना करावा लागत आहे. गश्मीर या सर्वाला समोर जात आहेत.

गश्मीरने नुकताच त्याच्या चाहत्यांनी संवाद साधला आहे. तसेच या माध्यमातून त्याने अनेक प्रश्नांनाची उत्तरे देखील दिली आहेत. या उत्तरांमुळे कदाचित प्रेक्षकांचा आणि त्याच्या चाहत्यांचा त्याच्यावरील राग कमी होईल.

गश्मीर महाजनीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'अस्क गश्म' हे सेशन केलं. या सेशनमध्ये चाहत्यांनी गश्मीरला अनेक प्रश्न विचारले. त्यात एकाने गश्मीरला 'वडील वारले की केस कापतात. यावर काय बोललं... मला तुमचं मत ऐकायला आवडेल' याला उत्तर देत गष्मीरने म्हटलं की, मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थजन होते. टक्कल केले असत तर हातातून कामे गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?'

जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे १५ जुलैला कार्डियाक अरेस्टने निधन झाले. रवींद्र महाजनी पुण्याजवळील आंबी या गावी एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर गश्मीर महाजनी आणि त्याच्या कुटुंबाला टीकेला सामोरे जावे लागले. (Latest Entertainment News)

Gashmeer Mahajani Instagram Story

सुप्रसिद्ध कलाकाराचा मुलगा असूनही गश्मीरला खूप संघर्ष करावा लागला. तो अभिनेता तर आहेत त्यासह तो उत्तम डान्सर देखील आहे. गश्मीरने 'जाणता अ जाणता' या नाटकातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं.

सरसेनापती हंबीरराव, देऊळ बंद, कान्हा, कॅरी ऑन मराठा या चित्रपटांमध्ये (Movie) गश्मीरने काम केले आहे. तसेच गश्मीरने हिंदी मालिका आणि रिऍलिटी डान्समध्ये देखील काम केलं आहे. तेरे इश्क में घायल आणि इमली या हिंदी मालिकांमध्ये तो काम करत होता.

गश्मीर पुन्हा एकदा एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी पोस्ट करत त्याने ही माहिती शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT