मनोरंजन बातम्या

Miss world 1996 : अमिताभ बच्चन यांच्यावर ७० कोटींचं कर्ज का झालं? स्वत: बिग बीने सांगितलं कर्जबाजारीपणाचं कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Why did Amitabh bachchan in 70 crore debt :

बातमीचे शीर्षक वाचून तुम्ही कदाचित चिंतेत पडला असाल. अमिताभ बच्चन कर्जबाजारी कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु वाचक मित्रांनो, हा घटना आहे १९९६ची ज्यावेळी अमिताभ बच्चन यांना त्यांचे घर तारण ठेवावे लागले होते. हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊ. (Latest News)

आज संपूर्ण जगाच्या नजरा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरवर खिळल्या आहेत. त्याच कारण म्हणजे येथे होत असलेल्या मिस वर्ल्डच्या कार्यक्रम. भारताची सिनी शेट्टी मिस वर्ल्डचा ताज जिंकणार की नाही हे अवघ्या काही तासांच्या प्रतीक्षेनंतर कळेल. भारतात दुसऱ्यांदा हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. २७ वर्षांनंतर भारताला दुसऱ्यांदा मिस वर्ल्डचा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळालीय. दरम्यान पहिल्यांदा १९९६ मध्ये भारताने मिस वर्ल्डचा कार्यक्रम आयोजित केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याच दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कर्जबाजारी झाले. इतके कर्जबाजारी की त्यांना बँकेचे कर्ज फेडण्यासाठी घर तारण ठेवावे लागले होते. १९९६ मध्ये असं काय झालं होतं हे जाणून घेऊ..

मिस वर्ल्डला लोक का विरोध का होता?

१९९६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भारतात मोठा विरोध झाला होता. या कार्यक्रमाच्या निषेधार्थ ५०० हून अधिक महिलांनी रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला होता. मिस वर्ल्डसारख्या सौंदर्य स्पर्धांद्वारे मोठ्या संख्येने महिलांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा कार्यक्रम समाज आणि संस्कृतीसाठी धोकादायक असा आरोप करण्यात येत होता. या कार्यक्रमाला विरोध इतका वाढला होता की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपये मागावे लागले होते. तसेच मिस वर्ल्डची स्विमसूट फेरी बेंगळुरूऐवजी सेशेल्समध्ये आयोजित करावी लागली होती.

अमिताभ बच्चन का झाले कर्जबाजारी

मिस वर्ल्डच्या विरोधामुळे आणि कार्यक्रमाच्या जागा बदलाचा सर्वाधिक फटका बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना बसला. ABCLनावाची त्यांची कंपनी भारतात या कार्यक्रमाचे आयोजन करत होती. यात अमिताभ बच्चन यांचे इतके नुकसान झाले की ते दिवाळखोर झाले. वीर संघवीच्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी स्वत: याबाबत खुलासा केलाय. ते आणि त्यांची ड्रीम कंपनी लोकांच्या विरोधाला कशी बळी पडल्याचं अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले.

मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्याचे काम अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने घेतले होते. परंतु विरोध सुरू झाल्यानंतर त्यांची कंपनीमधील टीम पूर्णपणे गोंधळून गेली होती. संपूर्ण अभ्यास करून बिग बी यांच्या कंपनीने हे काम हाती घेतले होते. तरीही त्यांना ७० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानापोटी अमिताभ बच्चन यांना बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्यांचा बंगला गहाण ठेवावा लागला.

इतकेच नाही तर त्याच्या कंपनीवर गुन्हादेखील दाखल झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन अनेक अडचणीत अडकले होते. त्याच काळात एबीसीएल बॅनरखाली बनवलेले चित्रपटही फ्लॉप झाले. यामुळे या कर्जातून त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. याचदरम्यान या कर्जातून मुक्त होण्यासाठी अमिताभ बच्चन यांना त्यांचे मित्र धीरूभाई अंबानी आणि अमर सिंह यांनी मदत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT