Abhishek Bachchan Net Worth Instagram @bachchan
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan Purchase New Flat : अभिषेक बच्चनने मुंबईत ४ मोठे फ्लॅटसह का खरेदी केले 252 स्वेअर फूटचे दोन अपार्टमेंट? बॉलिवूडच्या गुरूचं काय आहे लॉजिक

Abhishek Bachchan Purchases Six Apartments : अभिषेक बच्चन याने गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईतील बोरिवलीमध्ये सहा घरं खरेदी केली आहेत. त्याने एकाच मजल्यावर दोन छोटे फ्लॅट्स का खरेदी केले आहेत, जाणून घेऊया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिषेक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिषेक बच्चन याने गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईतील बोरिवलीमध्ये सहा घरं खरेदी केली आहेत. नेमके त्याने एकाच मजल्यावर दोन छोटे फ्लॅट्स का खरेदी केले आहेत, जाणून घेऊया

ओबेरॉय सिटी प्रोजेक्टअंतर्गत ओबेरॉय रिॲलिटी, बोरिवली येथे ५७ व्या मजल्यावर त्याने लक्झरीयस अपार्टमेंट्स खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट एकूण ४,८९४ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. ३१,४९८ रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने विकली गेली आहेत. कागदपत्रांमध्ये पुढे नमूद केले आहे की, १० कार पार्किंग सुविधांसह सहा अपार्टमेंटची नोंदणी २८ मे २०२४ रोजी झाली होती.

त्यातील पहिला फ्लॅट १,१०१ चौ. फुट इतका असून त्याची किंमत ३ कोटी ४२ लाख आहे. दुसरा आणि तिसरा फ्लॅट २५२ चौ.फुट इतका असून त्याची किंमत ७९ लाख आहे. चौथा फ्लॅट १,१०१ चौ. फुट इतका असून त्याची किंमत ३ कोटी ४२ लाख आहे. पाचवा आणि सहावा फ्लॅट १,०९४ चौ. फुट इतका असून त्याची किंमत ३ कोटी ३९ लाख आहे.

अभिषेक बच्चनने २५२ चौ.फुटांचे दोन अपार्टमेंट्स विकत घेतले आहेत. ते दोन्हीही रुम्स 1RK आहेत. बॉलिवूड स्टारने २५२ चौ.फुटांचे अपार्टमेंट का खरेदी केले? अनेकदा जेव्हा विकासक औद्योगिक जमीन खरेदी करतात. तेव्हा अनेक डेव्हलपर्स औद्योगिक जमिनीचे निवासी वापरात रूपांतर करण्यासाठी ज्या अटींची पूर्तता करावी लागते ती प्रकल्पाच्या एका भागात परवडणारे अपार्टमेंट असते. त्यामध्ये अनेक आर्किटेक्ट्स लहान आणि मोठे अपार्टमेंट्स तयार करतात, असे आर्किटेक्ट्सने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले

अभिषेक बच्चन अनेक कोट्यवधींचा मालक आहे. अशातच अभिषेक बच्चनने बोरिवलीमध्ये सहा अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. त्याने यापूर्वीही याच प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली होती. बच्चन यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबईतील वरळी येथील ओबेरॉय ३६० मध्ये ४५. ७५ कोटींचा घर खरेदी केलं होतं. तर २०१४ मध्येही कोट्यवधींचा फ्लॅट विकत घेतला होता. त्याच्यासोबत अभिनेता रणवीर सिंहनेही त्याच प्रोजेक्टमध्ये घराची इन्वेस्टमेंट केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT