सध्या रणबीर कपूर आणि रश्मिकाचा 'अॅनिमल' चित्रपट खूप चर्चेत आहे. हजार कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट लवकरच येईल. या चित्रपटातील दाखवण्यात आलेली हिंसेमुळे यावर अनेकांनी ताशेरे ओढले आहेत तर अनेकांनी या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या अडल्ट सीनवर टीका केलीय. या सर्वांमध्ये रणबीर आणि तृप्ती डिमरी याच्यातील लिपलॉकच्या सीनची सर्वाधिक चर्चा होत आहे. (Latest News)
या सीनमुळे तृप्ती डिमरीची क्रेझ वाढलीय. पण वाचकांनो तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडमधील पहिला सीन कधी आणि कोणत्या चित्रपटात चित्रित करण्यात आला होता ते. नाही, ना चला तर त्याचा उलगडा आपण येथे करू. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला किसिंग सीन 'कर्मा' चित्रपटात दाखवण्यात आला होता. हा चित्रपट १९३३ साली प्रदर्शित झाला होता. ‘कर्मा’ चित्रपटातील हा सीन देविका राणी आणि हिमांशु राय यांच्यावर चित्रित करण्यात आला होता. हा इंटिमेट सीन जवळपास ४ मिनिटे चालला. हे त्या काळातील आहे जेव्हा किसिंग सोडा, साधी सामान्य रोमँटिक दृश्ये देखील दाखवली जात नव्हती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खरंच झाला होता किसिंग सीन?
या चित्रपटात देविका राणी आणि हिमांशू राय यांच्यात किसिंग सीन झाला होता. पण किस करण्याचा सीन हा रोमान्ससाठी नव्हता तर काहीतरी वेगळेच कारण होतं. चित्रपटात हिमांशू यांना सर्पदंश करतो. सर्पाचे विष काढण्यासाठी चित्रपटातील नायिकेला नायकाला किस करावं लागला होता. स्क्रिप्टमध्ये असं होतं की, नायक हा बेशुद्ध होतो. त्यानंतर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी देविका त्याला पुन:पुन्हा किस करते.
हा चित्रपट वादात सापडला
देविका राणी आणि हिमांशू राय रिअल लाइफमध्ये पती-पत्नी होते. म्हणजेच काय देविका या चित्रपटात दुसऱ्याला नाहीतर तिच्या पतीला किस करत होती. मात्र या किसिंग सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला होता. मोठ्या पडद्यावर अशाप्रकारचे इंटिमेट सीन दाखवणे योग्य नाही असे अनेकजण म्हणत होते. ज्या काळात रोमँटिक सीन दाखवण्यासाठी फुले, पाने आणि झुडपांचा वापर केला जात असे. त्या काळात असे लिपलॉक सीन दाखवणे ही मोठी गोष्ट होती. त्या काळात ‘कर्मा’ चित्रपटात किसिंग सीन शूट केला गेला.
चार मिनिटे चालला सीन
चित्रपटात हा सीन ४ मिनिटे चालला होता. देविका-हिमांशूच्या या किसिंग सीनने लोकांमध्ये खळबळ उडवून दिली होती. दरम्यान देविका आणि हिमांशू लंडनमध्ये भेटले होते. दोघांनी मिळून भारतातील पहिला व्यावसायिक चित्रपट स्टुडिओ सुरू केला, ज्याचे नाव 'बॉम्बे टॉकीज' ठेवलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.