Bollywood Actor Saam Tv
मनोरंजन बातम्या

No Shave November Bollywood: 'नो शेव्ह नोव्हेंबर' ट्रेंडमध्ये बॉलिवूड कलाकारांचा सहभाग, साजरा करण्यामागेही अनोखे कारण

नोव्हेंबर महिन्यात कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा महिना 'मुव्हेंबर' किंवा ' नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणुन साजरा करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

No Shave November Trend: नोव्हेंबर महिना सुरु होताच भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सोशल मीडियावर 'नो शेव्ह नोव्हेंबर' (No Shave November) चर्चा सुरु होते. आता नक्कीच प्रश्न पडला असेल की, 'नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणजे काय? खरं तर नोव्हेंबर महिन्यात पुरुषांनी दाढी न करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा महिना 'मुव्हेंबर' किंवा ' नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणुन साजरा करतात. आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे.

बॉलिवूडमधील बरेच कलाकारही या ट्रेंडला फॉलो करतात. चला तर पाहूया नक्की हा ट्रेंड बॉलिवूड कलाकार कसे फॉलो करतात. बॉलिवूडमधील कलाकारांचे आणि दाढीचे नाते खूप जुने नाहीत. ९०च्या दशकातील कलाकारांबद्दल बोलायचे तर, तेव्हाचे कलाकार क्लिन शेव्ह राहायचे.

याआधी दाढीतील नायक सिनेसृष्टीत कधीच दिसत नव्हता. पण कालांतराने काळ आणि वेळ बदलत जाऊन कलाकारांनी दाढीला प्राधान्य दिले. सोशल मीडियाच्या या जगात भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बियर्डमॅन लूक जपताना दिसत आहे.

दाढी पुरुषाला एक वेगळीच ओळख देते. बॉलिवूडमधील बरेच कलाकारही बियर्डलूक करतात. बॉलिवूडमधील बरेच कलाकार या महिन्यात 'नो शेव्ह नोव्हेंबर'साजरा करणार आहेत. जर तुम्हाला ही 'नो शेव्ह नोव्हेंबर' महिना साजरा करायचा असेल तर या कलाकारांना फॉलो करा.

Bollywood

वरुण धवन

वरुण आपल्या खास दाढीच्या लूकमध्ये खूपच वेगळा दिसतो. त्याची ही शैली चाहते कॉपी करत असतात.

विकी कौशल

विकीने काही चित्रपटांमध्ये बियर्डलूक ठेवल्याने त्याच्या लूकची चर्चा झाली होती. तुम्हीही त्याची शैली नक्कीच वापरु शकता.

Bollywood

कार्तिक आर्यन

कार्तिक प्रत्येक चित्रपटात बियर्डलूक मध्येच दिसतो. त्याच्या त्या खास लूकने प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

शाहिद कपूर

शाहिदच्या 'कबीर सिंग आणि उडता पंजाब' या चित्रपटातील लूकने चाहतावर्ग ती शैली वापरु लागले.

रणवीर सिंग

रणवीर नेहमीच बियर्डलूक मध्ये पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतो.

का साजरा केला जातो, 'नो शेव्ह नोव्हेंबर' (No Shave November)

'नो शेव्ह नोव्हेंबर' हा ट्रेंड जगभरात साजरा केला जातो. जगभरात एक जागरुकता व्हावी, याकरिता हे अभियान राबवले जाते. अनेक कर्करोग रुग्ण आपल्या केसांना आजारामुळे गमवतात. या महिन्यात पुरुष केसांची वाढ होऊन देतात. बरेच नागरिक आपले केसही दान करतात. अनेक देवस्थानी आपले केस ते दान करत असतात. या उपक्रमाअंतर्गत जमा झालेला निधी कॅन्सर प्रतिबंध, जीव वाचवणे, रुग्णांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Ambadas Danve : बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा आहे; अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election : आबांचा विरोधक मुलाशी लढणार, तासगावमध्ये २ पाटलांमध्ये काँटे की टक्कर

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT