Bengali Televison Actress Road Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bengali Televison Actress Lossed Life: प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू; सिनेसृष्टीवर पसरली शोककळा...

शनिवारी रात्री अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ताचा मालिकेच्या शूटिंगवरून घरी परतताना अपघात झाला आहे.

Chetan Bodke

Bengali Televison Actress Road Accident: पश्चिम बंगालमधील बारानगर येथील एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचा लॉरीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सुचंद्र दासगुप्ता असं त्या टेलिव्हिजन अभिनेत्रीचे नाव आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ता शूटिंगवरून घरी परत होती. दुचाकीवरून घरी जाताना बारानगर पोलीस ठाण्याच्या घोषपाडाजवळ एका लॉरीने सुचंद्रच्या दुचाकीला धडक दिली. अपघातामुळे तेथील रोडवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत देखील झाली होती.

या धडकेत अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने बारानगर घोषपाडा परिसरात खळबळ उडाली आहे. बारानगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ट्रक चालकाला तात्काळ अटक केली आहे. घटनेची नेमकी वेळ कळत नसल्याने सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजेस चेक करत आहेत. या घटने संदर्भात सध्या दुचाकी ज्याच्या नावावर आहे, त्याच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने जागीच ब्रेक मारताच क्षणी ती दुचाकीवरून खाली पडली. तेवढ्यात पाठीमागून एक लॉरी येत होती. तिने हेल्मेट घातले होते, तरी देखील तो हेल्मेट तिचा जीव वाचू शकला नाही, त्या ट्रकच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. सोबतच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या अंगावरून त्या ड्रायव्हरने ट्रक घातला होता, तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

सुचंद्र दासगुप्ता ही बंगाली टेलिव्हिजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नेहमीप्रमाणे काल रात्री देखील ती शूटिंग आटोपून परतत होती. नेहमीप्रमाणे जात असताना तिच्यावर काळाने घाला घातला. अभिनेत्रीचे घर बारानगरमध्ये असल्याची माहिती आहे. काल रात्री शूटिंग आटोपल्यानंतर ती ऑनलाईन बुक केलेल्या बाईकने घरी परतत होती. तिच्या निधनाची बातमी ऐकून कुटुंबीयांसह टेलिव्हिजनसृष्टीवर देखील शोककळा पसरली.

सुचंद्र दासगुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका 'गौरी'मध्ये सह-अभिनेत्री म्हणून काम करत होती. या मालिकेतून सुचंद्र दासला खूप प्रसिद्धी मिळाली आणि चाहत्यांकडून चांगली प्रसिद्धीही मिळली. सुचंद्र दासगुप्ताच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेते म्हणतात, सुचंद्र दासने अलीकडच्या काळात टेलिव्हिजन विश्वात खूप नाव कमावले आहे. तिच्या निधनामुळे बंगालच्या उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

Places To Avoid Visit In Summer: एप्रिल- मे महिन्यात या 3 ठिकाणी बिलकूल भेट देऊ नका, गर्मीमुळे व्हाल हैराण

Borivali Tourism : चला वीकेंडला फिरायला! उन्हाळ्यात थंडावा देणारी 'बोरीवली'तील ५ सुंदर पिकनिक स्पॉट

Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

April 2026 Festival Calendar: एप्रिल महिन्यात कोणकोणते महत्वाचे सण आहेत? A टू Z माहिती एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT