मुंबई: सध्या सोशल मीडियावर (Social Media) मीम्सचा चांगलाच पाऊस पडत आहे. कधी कोणावर कोणत्या मुद्द्यावरून मीम्स व्हायरल (Viral Meams) होईल सांगू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही मुद्द्यावर व्हिडिओ किंवा फोटो बनवून शेअर केला जातो. त्याच मीम्स पुढे बऱ्याच व्हायरल होऊन चर्चेचा विषय ठरतात. अशीच एक मीम्स व्हायरल झाली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची. (West Bengal Chief Minister)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर मीम बनवणे एका युट्यूबरला चांगलेच महागात पडले आहे. ममता बॅनर्जींवर आक्षेपार्ह मीम बनवल्याच्या आरोपाखाली नादियातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांच्या सप्रेशन अँड इंटेलिजन्स ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी 30 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तुहिन मंडल हा युट्यूबर (Youtuber) असून नादिया इथल्या ताहेरपूरमधून त्याला अटक केली आहे.
त्याच्या सोबतच त्याचा मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला आहे. सोबतच विविध कलमांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तुहिनची पोलिसांकडे तक्रार सागर दास नामक व्यक्तीने केली होती. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून सोशल मीडियावर अपमानास्पद मीम्स व्हायरल करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. सागरने याविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली आहे.
सागरने तुहिनसोबत पश्चिम बंगालच्या अनेक युट्यूबरची नावे या तक्रारीत दिली आहेत. तक्रार मांडताना स्पष्ट केले की, युट्यूब चॅनल्सला आर्थिक लाभ चांगला होतो म्हणून त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाषण अपमानास्पद पद्धतीने मांडले. अशा आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मीम्समुळे राज्यातील वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे. यावेळी पोलिसांनी तुहिनसोबत अनेक युट्यूबरवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
Edit By- Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.