Comedian star Raju Srivastava Saam TV
मनोरंजन बातम्या

प्रसिध्द कॅामेडीयन स्टार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील एम्स रूग्णालयात केलं दाखल

प्रसिध्द स्टॅडअप कॅामेडीस्टार अशी ख्याती असणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्रसिध्द स्टॅडअप कॅामेडीस्टार अशी ख्याती असणारे राजू श्रीवास्तव (Comedian star Raju Srivastava) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना तब्येत बिघडली असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजू श्रीवास्तव आज सकाळी नेहमीप्रमाणे जिम मध्ये गेले यावेळी वर्कआऊट करत असताना त्याची प्रकृती बिघडली. दरम्यान वर्कआऊट करताना ते ट्रेडमिलवरून खाली पडले आणि बेशुध्द झाले तेव्हा त्यांना ताबडतोब दिल्लीतील एम्स रूग्णालयातIIMS Hospital) हलवण्यात आले. सुत्राच्या माहितीनुसार सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत ठीक असल्याचं समजत आहे.

पाहा व्हिडीओ -

राजू श्रीवास्तव यांच्या बातमीमुळे त्याच्या चाहत्यामध्येही निराशा पसरली आहे. श्रीवास्तव हे लोकप्रिय कॅामेडीस्टार आहेत. त्यांनी अनेक सिनेमा, मालिकांमध्ये त्यांच्या हटक्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अनेक दिग्गज मंडळीच्या नक्कल करून त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. याशिवाय उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे ते अध्यक्ष आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला भगिनींनी बांधली राखी

Mumbai News: निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल, मुंबईत रास्तारोको आंदोलन|VIDEO

Electric Shock : तारेवरचे कपडे काढताना अनर्थ घडला; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT