Weekend Blockbuster  saam tv
मनोरंजन बातम्या

Weekend Blockbuster : बॉक्स ऑफिसवर रणधुमाळी! अॅक्शन, कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका, एकाच दिवशी ४ चित्रपट होणार प्रदर्शित

चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून,एकाच दिवशी चार चित्रपट रिलीज होत असल्याने वीकेंडचा थरार द्विगुणित होणार आहे.

Saam Tv

येत्या शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये अॅक्शन, कॉमेडी, रहस्य आणि थराराचा भरपूर डोस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध असून चार प्रमुख चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने असणार आहेत. या चारही चित्रपटांमुळे या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

रणबाली

राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित 'रणबाली', ज्यामध्ये विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना आणि अर्नोल्ड वोस्लू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात एका बहादूर योद्धा आणि त्याच्या पत्नीची कथा दाखवण्यात आली आहे, जे ब्रिटीशांच्या अत्याचाराविरुद्ध आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढा देतात.

नयी नवेली

बालाजी मोहन दिग्दर्शित 'नयी नवेली' हा फँटसी कॉमेडी ड्रामा आहे. यामध्ये यामी गौतम, मीता वशिष्ठ, सुनीता राजवर, आदित्य कुलश्रेष्ठ आणि आदिनाथ एम. कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा मोहिनीची आहे, जी लग्न करून मेरठच्या एका विस्कळीत कुटुंबात येते. तिच्या येण्याने घरातील वातावरण बदलू लागते, मात्र घरातील काही लोकांना तिच्याबद्दल संशय येतो की नवीन सून ही सामान्य मनुष्य नसून डायन आहे.

प्रहार

'प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' हा अविनाश अरुण दिग्दर्शित बायोग्राफिकल ड्रामा आहे. यामध्ये राजकुमार राव, वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर, आशीष विद्यार्थी, ललित प्रभाकर, ऋत्विक सहोरे आणि तरुण शर्मा हे कलाकार आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवन आणि कारकिर्दीवर आधारित असून यात त्यांच्या सर्वात चर्चित आणि मोठ्या खटल्यांचे चित्रण केले गेले आहे.

क्रेजी कल्याणम

भद्रप्पा गजुला दिग्दर्शित 'क्रेजी कल्याणम' हा तेलगू फॅमिली कॉमेडी ड्रामा आहे. यामध्ये तरुण भास्कर धास्यम आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही एका पित्याची कथा आहे जो आपल्या मुलीचे लग्न करून तिला सुखी पाहू इच्छितो, परंतु मुलीची विचारसरणी वेगळी असते. या दोघांच्या इच्छेमधील संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Protest: ऐन दिवाळीत शेतकरी रस्त्यावर, पुणे-बंगळूरू महामार्गावर रास्तारोको; उसाला 4500 रुपयांचा दर देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना 5 लाखांचा दंड, BMC आयुक्तांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Bank Election: जिल्हा बँकांची तिजोरी कुणाकडे? साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार?

Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

सत्तेतला पक्ष, पण कामांचा पत्ता नाही? वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला? देवगिरीवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT