Phir Aayi Hasseen Dillruba Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Phir Aayi Hasseen Dillruba : 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर प्रदर्शित, ९ ऑगस्टला पहायला मिळणार तापसी-विक्रांत-सनीची प्रेमकाहाणी

Phir Aayi Hasseen Dillruba Trailer : 'हसीन दिलरुबा' पुन्हा एकदा आपल्या सौंदर्यातून लोकांना जाळ्यात फसवण्यासाठी परत आली आहे. नुकतच 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Apurva Kulkarni

'हसीन दिलरुबा' पुन्हा एकदा आपल्या सौंदर्यातून लोकांना जाळ्यात फसवण्यासाठी परत आली आहे. नुकतच 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये तापसी विक्रातची प्रमकाहाणी पहायला मिळणार आहे. ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपल्या अभिनयातून तसंच सौंदर्यातून प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या तापसी पन्नूचा 'हसीना दिलरुबा 2'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधून तापसीचं सौंदर्य पुन्हा प्रेक्षकांना भावलं आहे. एकदम सुंदर अशा लाल रंगाच्या साडीत विक्रांत सोबतची केमिट्री ट्रेलरमधून दाखवण्यात आली आहे. आपल्या सुंदरेतून लोकांना जाळ्यात फसवण्यासाठी तापसीचा थ्रिलर ड्रामा 'फिर आई हसीन दिलरुबा'मधून पहायला मिळणार आहे. 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की, राणी रिशूला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असते. तर तिकडे सनी कौशलची एन्ट्री होते आणि सिनेमात एक नवाच ट्वीस्ट येतो. रिशूला मिळवण्यासाठी पागल असलेली राणी अचानकच सनीच्या प्रेमात पडते. राणीला सनीशी जवळीक साधताना पाहून इकडे रिशूचा जळफळाट व्हायला लागतो. रिशूचा राग सिनेमाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातो. आणि सुरू होतं ते मृत्यूचं तांडव.

सस्पेंन्स, छळ, ड्रामा, रोमान्स आणि मरण याचा खेळ 'फिर आई हसीन दिलरुबा'च्या ट्रेलरमधून दाखवण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यास प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. तापसी पन्नू सोबत या चित्रपटात विक्रांत आणि सनी कौशल पहायला मिळणार आहे.

तसंच चित्रपटात तापसी आणि विक्रांत यांचा रोमान्स देखील दाखवण्यात आला आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हसीन दिलरुबा चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याता आता या चित्रपटाचा सिक्वल आल्यानं प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

'फिर आई हसीन दिलरुबा'च्या ट्रेलरमधून सस्पेंस पुन्हा प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा आहे. या सिक्वलमध्ये हसीन दिलरुबा पहिल्यापेक्षा जास्त निर्दयी दाखवण्यात आली आहे.

नेटफ्लिक्सने आपल्या सोशल साईटवर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा हसिनाची सुंदरता पहायची उत्सुकता लागली आहे. ड्रामा, सस्पेन्स, छळ आणि मृत्यू अश्या गोष्टीने भरलेला चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT