Web Series On Lawrence Bishnoi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lawrence Bishnoi: सलमानचा पक्का वैरी, मुंबई ते कॅनडा जगभरात ७०० शूटर्सची फौज; लॉरेन्स बिश्नोईवर येतेय वेब सीरीज, नावही ठरलं!

Web Series On Lawrence Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यावर लवकरच वेबसीरिज बनवली जाणार आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सलमान खानचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर आली. अशातच आता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यावर लवकरच वेबसीरिज बनवली जाणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच याची घोषणा केली असून अॅक्शन सीन असलेली सीरिज लवकरच बनेल. माहितीनुसार, जानी फायरफॉक्स फिल्म प्रोडक्शन हाऊसद्वारे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर वेब सीरिज बनवली जाणार आहे. या वेब साीरजमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यात नेमकं काय काय घडलं? एक तरूण गँगस्टर कसा बनला याचा प्रवास असणार आहे.

अॅक्शन असलेल्या या वेब सीरिजचं नाव 'लॉरेन्स ए गँगस्टर स्टोरी' असं असणार आहे. इंडियन मोशन पिक्चर असोसिएशनने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सीरिजच्या नावाला मान्यता देखील दिली आहे. सत्य घटनेवर आधारित ही वेबसीरिज नेमकं काय उलगडणार याची उत्सुकता आहे. या सीरिजमध्ये एका तरूण गँगस्टर कसा बनला याची कथा असणार आहे. या सीरिजमध्ये लॉरेन्स बिश्नोईची भूमिका कोण साकारणार आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT