actor Brajesh Kumar Ramgopal Rewar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेता निघाला चोर; बहिणीच्या लग्नासाठी केली चोरी, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Actor Arrested: वेब सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता टेम्पो चोरीप्रकरणी अटक करण्यात आले आहे. या अटकेनंतर त्याची सध्याची परिस्थिती बिकट करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

संजय गडदे, साम टिव्ही

Actor Arrested: वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याला टेम्पो चोरीप्रकरणी अटक करण्यात आल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. ब्रजेशकुमार रामगोपाल रेवार उर्फ टायगर (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, मुंबईच्या आरे पोलिसांनी त्याला गोरेगाव पूर्व परिसरातून अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 4.20 लाख रुपये किमतीचा टेम्पो हस्तगत करण्यात आला असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजेशकुमार रेवारने यापूर्वी काही वेब सीरिजमध्ये काम केले होते. मात्र गेल्या काही काळापासून त्याला काम मिळेनासे झाले. उत्पन्नाचा कोणताही स्थिर स्रोत नसल्याने त्याने उपजीविकेसाठी टेम्पो चालवण्यास सुरुवात केली. दरम्यान, घरातील आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. विशेषतः बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या रकमेची गरज होती. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आरोपीने चुकीचा मार्ग स्वीकारत टेम्पो चोरीचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

गोरेगाव पूर्व येथून चोरी झालेल्या टेम्पोबाबत तक्रार दाखल होताच आरे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर आरोपीला अटक करत चोरीचा टेम्पो जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाबाबत आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आरोपीकडून गुन्ह्याची कबुली मिळाली असून, या चोरीमागील संपूर्ण नेटवर्कचा तपास केला जात आहे. कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

शेतकऱ्यांची दिवाळी गोड! आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 'फार्मर आयडी', फडणवीस सरकारकडून SOP जाहीर, कुणाला मिळणार लाभ?

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाहीये? कमी बजेटमध्ये पाहा ७ खास गिफ्ट आयडिया!

Daily Wear Kurti And Dress For Women: महिलांसाठी लेटेस्ट पंजाबी ड्रेस आणि कुर्ती डिझाइन्स, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

PG Medical Seats : डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार पूर्ण! महाराष्ट्रात हजारो पीजी मेडिकल सीटची भर, कोणत्या कॉलेजमध्ये वाढल्या सर्वाधिक जागा?

SCROLL FOR NEXT