War 2 VS Coolie SAAM TV
मनोरंजन बातम्या

War 2 VS Coolie : रजनीकांत यांच्या 'कुली'ची पहिल्या आठवड्यात छप्परफाड कमाई, 'वॉर 2' लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा

War 2 VS Coolie Box Office Collection Day 7 : 'कुली' आणि 'वॉर 2' चित्रपटाने एका आठवड्यात किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात. 'कुली' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Shreya Maskar

'वॉर 2' आणि 'कुली' दोन्ही चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज झाले.

हृतिक रोशनचा 'वॉर 2' लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

'वॉर 2' आणि 'कुली' दोन्ही ॲक्शन चित्रपट आहे.

रजनीकांतच्या (Rajinikanth ) 'कुली' (Coolie ) चित्रपटाने ज्युनिअर एनटीआरच्या (Junior ntr) 'वॉर 2' (War 2) चित्रपटाने मागे टाकले आहे. दोन्ही चित्रपट 14 ऑगस्ट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. 'कुली' आता लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर 'वॉर 2' 200 कोटींचा टप्पा गाठणार आहे. दोन्ही चित्रपटाने एका आठवड्यात किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'कुली' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 7

रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केली आहे. भारतात अंदाजे 260.6 कोटी रुपये कमावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी चित्रपटाने 9.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. एका आठवड्यात 'कुली' चित्रपटाने आपले बजेट वसूल केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुली' चित्रपटाचे बजेट 350 कोटी रुपये आहे.

चित्रपटाने रिलीजच्या सातव्या दिवशी बुधवारी 6.5 कोटींची कमाई केली आहे.'कुली' चित्रपटाने जगभरात 422.8 कोटींची बंपर कमाई केली आहे. चित्रपटाने परदेशात 162.2 कोटी रुपये कमाई केली.

'वॉर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 7

'वॉर 2' चित्रपटाने सोमवारी 8.50 कोटी रुपये, मंगळवारी 9 कोटी रुपये आणि बुधवारी 3.49 कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे एका आठवड्यात 'वॉर 2'ने 196.99 कोटींचा गल्ला जमावला आहे.

'कुली' vs 'वॉर 2'

रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात रजनीकांत, आमिर खान, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हसन आणि सत्यराज असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर'चा सिक्वेल आहे. 'वॉर 2' मध्ये ज्युनिअर एनटीआरसोबत हृतिक रोशन (Hrithik Roshan)आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)पाहायला मिळत आहे. दोन्ही ॲक्शन चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

SCROLL FOR NEXT