Sumeet Raghavan : रस्त्यांची दुरावस्था पाहून सुमीत राघवन संतापला, पोस्ट शेअर करत गडकरी-फडणवीसांना केली विनंती

Sumeet Raghavan Post : अभिनेता सुमीत राघवनने महाराष्ट्रात सुरू असलेल्या परिस्थितीवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये नेमकं काय, जाणून घेऊयात.
Sumeet Raghavan Post
Sumeet RaghavanSAAM TV
Published On
Summary

गेल्या 4-5 दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तसेच महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून कबुतरं, हिंदी-मराठी वाद पाहायला मिळत आहे.

अशात आता अभिनेता सुमीत राघवनने महाराष्ट्रात सुरू असलेल्या परिस्थितीवर आपले मत मांडले आहे.

'वागले की दुनिया' या शोचा अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुमीत राघवने सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे आणि वास्तवात काय केले पाहिजे यासंबंधित पोस्ट केली आहे. तसेच त्याने सरकारला सल्ला दिला आहे.

सुमीत राघवन इन्स्टाग्रामच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला त्याने खास कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर पावसाचं पाणी साठू नये म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरताना दिसत आहे. त्याची माहिती व्हिडीओतून देण्यात आली आहे. यावर सुमीत राघवनने लिहिलं की, "रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा आपल्या देशात आणि राज्यात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कृपा करून हे बघा.."

सुमीत राघवनने आपल्या पोस्टमध्ये वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. सुमीत राघवनची या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सुमीत राघवन कायमच सामाजिक प्रश्नांवर आपली ठामपण मते मांडताना दिसत आहे. गेल्या 4-5 दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचे, काही भागांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेले खड्डे अनेक समस्या उद्भवत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते.

Sumeet Raghavan
Sumeet Raghavan instagram

वर्कफ्रंट

सुमीत राघवन अलिकडेच 'वागले की दुनिया' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र आता या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 'वागले की दुनिया' या शोने तब्बल 5 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सुमीत राघवनने आजवर अनेक हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sumeet Raghavan Post
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचं चाहत्यांना चॅलेंज, वर्कआऊटचा VIDEO केला शेअर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com