YRF Spy Universe Latest Films Saam Tv
मनोरंजन बातम्या

YRF Spy Universe Films: यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये दिसणार नव्या सिनेमांची मेजवानी; ‘ग्रीक- गॉड’सोबत साऊथ सुपरस्टारची हातमिळवणी

‘पठान’ चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील काही चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. चला तर जाणून घेऊया चित्रपटाबद्दल...

Chetan Bodke

YRF Spy Universe Latest Films: यशराज फिल्म्सचे चित्रपच म्हटले की, प्रेक्षकांच्या आनंदाला नक्कीच उधाण येतं. यशराज फिल्म्स आज हे भारतातील नावाजलेली प्रॉडक्शन कंपनी म्हणून नावा रुपाला आली. नुकतेच यशराज फिल्म्सच्या ‘पठान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. अशातच ‘पठान’ चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील काही चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. चला तर जाणून घेऊया चित्रपटाबद्दल...

चित्रपट समीक्षक, ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी नुकतच सोशल मीडियावर एक नवी पोस्ट केली आहे, त्या पोस्टमध्ये तरण आदर्श यांनी यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटांबद्दल माहिती दिली आहे. या वर्षात प्रेक्षकांना एकपेक्षा दमदार चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

या वर्षात यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील वॉर २ (War 2), टाइगर ३, (Tiger 3), टाइगर वर्सेस पठान (Tiger Vs Pathaan) हे तीन यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी देखील अनेक हिट चित्रपटांची मेजवानी यशराज फिल्म्सने प्रेक्षकांना दिली होती.

अद्याप वॉर २, टाइगर ३, टाइगर वर्सेस पठान या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी सुद्धा जाहीर केलेली नाही. यामध्ये वॉर २ (War 2) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आदित्य चोप्रा हे अयान मुखर्जीला (Ayan Mukerji) देणार आहेत, अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

सोबतच महत्वाची बाब म्हणजे, बॉलिवूडचा ‘ग्रीक- गॉड’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या हृतिक रोशनसोबत ‘वॉर २’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आरआरआर फेम ज्यूनिअर NTRदेखील दिसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मनोरंजन विश्वात यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सने स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता याच स्पाय युनिव्हर्सच्या फ्रँचायझीचा सुपरहिट चित्रपट ‘वॉर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT