Vivek-Aishwarya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek-Aishwarya: 'सगळं संपलं तरीही....' ऐश्वर्यासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारताच विवेक ऑबेरॉयचा खुलासा; तरुणांना दिला 'हा' मोलाचा सल्ला

विवेक ऑबेरॉयने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Pooja Dange

Vivek-Aishwarya Controversy: 'धारावी बॅंक' वेबसिरीजमधील दमदार अभिनयामुळे अभिनेता विवेक ऑबेरॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सिरीजमुळे विवेकने बॉलिवूडमध्ये पुन्हा पाय रोवायला सुरूवात केली आहे. कंपनी, शूट आऊट ऍट वडाला या चित्रपटांतून विवेकने सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र काही वादांमध्ये त्याचे नाव आले आणि सिने जगतातून तो जणू गायबचं झाला. यामध्ये ऐश्वर्या रायसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे सलमान खानशी त्याचा वाद चांगलाच गाजला होता. अलिकडेच विवेक ऑबेरॉयने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

ऐश्वर्या राय आणि विवेक ऑबेरॉय यांच्या प्रेमप्रकरणाची बॉलिवूडमध्ये आजही चर्चा होताना होते. दोघांचे प्रेमप्रकरण त्या काळी प्रचंड गाजले होते. इतकेच नव्हेतर ऐश्वर्यासोबतच्या संबंधांमुळेच सलमान खान आणि विवेकचा वाद सुरू झाला होता. यामुळेच विवेक ऑबेरॉयचे अभिनय करिअर संपल्याचेही बोलले जाते. (Aishwarya Rai)

अलिकडेच एका मुलाखतीत ऐश्वर्या रायबद्दल विचारले असता विवेक ऑबेरॉयला त्याबद्दल विचारले असता त्याने महत्वाचा खुलासाही केला. या मुलाखतीत विवेकला जर करिअरच्या सुरूवातीलाच ऐश्वर्यासोबतच्या प्रेमप्रकरणाबद्दल खुलासा केला नसता तर काय झाले असते असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विवेक म्हणाला की, मी याबद्दल बोलणार नाही असे नाही पण, आता हा विषय पुर्णपणे संपला आहे. पुढे बोलताना विवेक ऑबेरॉयने तरुणांना एक मोलाचा सल्लाही दिला आहे. (Celebrity)

काय म्हणाला विवेक ऑबेरॉय?

तरुणांना सल्ला देताना विवेक ऑबेरॉय म्हणाला की, "हे पाहत असलेल्या प्रत्येक तरुणाने आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करत असाल, ठाम असाल आणि त्यासाठी जिवतोड मेहनत करत असाल तर माझा एकच सल्ला आहे की तुमच्या कामावर, तुमच्या क्षमतेवर, तुमच्या कलेवर हल्ला करण्याची कोणालाही संधी देवू नका. कोणत्याही परिस्थितीत तुमचे ध्येय विचलित होऊ देवू नका कारण ते तुमच्या करिअरसाठी धोकादायक असेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT