Vivek Oberoi On Bollywood Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Oberoi: बॉलिवूडमुळे माझं करिअर उद्ध्वस्त; हिट चित्रपटानंतरही विवेकवर आली होती घरी बसण्याची वेळ

विवेकने इंडस्ट्रीतील त्याचे करिअर कसे उद्ध्वस्त झाले याबद्दल सांगितले.

Pooja Dange

Vivek Oberoi On Bollywood: विवेक ओबेरॉय एक उत्कृष्ट अभिनेता आहे. विवेक त्याच्या कारकिर्दीत विशेष काही करू शकला नाही. पण आता ओटीटीच्या जगात विवेक ओबेरॉयही वेबसीरीजच्या माध्यमातून आपल्या करिअरला नवीन भरारी देत आहे.

विवेक ओबेरॉयची 'धारावी बँक' ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. पण विवेक त्याचे कठीण दिवस विसरलेला नाही. धारावीच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत, विवेकने इंडस्ट्रीतील त्याचे करिअर कसे उद्ध्वस्त झाले याबद्दल सांगितले.

एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय म्हणाला की, तुम्हाला भारतात एक गोष्ट अगदी मोफत मिळते. तो म्हणजे सल्ला. बरेच लोक म्हणतात की अभिनय क्षेत्रात जाऊ नका. हे अतिशय जोखीम असलेले क्षेत्र आहे. अभिनेता असा नसतो, स्टार असा असतो. कालांतराने मला राम गोपाल वर्मा यांच्या फिल्म कंपनी या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. विवेक ओबेरॉय म्हणाला की, 2007 मध्ये त्यांनी शूटआउट अॅट लोखंडवाला सारखा सुपरहिट चित्रपट दिला. चित्रपटात चांगले काम करूनही त्याच्याकडे १८ महिने काम नव्हते. (Movie)

विवेक म्हणाला की, 'पूर्वी जर तुम्ही 10-15 लोकांना नियंत्रित करू शकता तर तुम्ही बॉलीवूड मीडियावरही नियंत्रण ठेवू शकता. दुर्दैवाने त्या 10-15 लोकांवर बॉलीवूडमधील पाच-दहा लोकांनी मीडियावर नियंत्रण ठेवले. यानंतर त्यांनी तेच सत्य दाखवले जे सत्य त्यांना लोकांना दाखवायचे होते. लोकांनी जे पाहिले त्यावरून आपले मत बनवले. सत्यापेक्षा समज मजबूत असते. (Bollywood)

शूटआउट अॅट लोखंडवालामध्ये त्याने एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. एक पात्र ज्याचे सर्वांनी कौतुक केले. प्रशंसा आणि यश मिळूनही त्याला काम न मिळण्याचे कारण काय होते. यावर विवेक म्हणाला की आता परिस्थिती बदलली आहे. ओटीटीने लोकशाही आणली. कोणी प्रतिभावान असेल तर तो स्टार म्हणून चमकेल. विवेकची ही मुलाखत समोर आल्यानंतर हे लक्षात आले किती विवेकाने नाव घातले नसले तर त्याचा निशाणा सलमानवरच होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT