The Vaccine War Saam TV
मनोरंजन बातम्या

Vivek Agnihotri Post: जबरदस्त ऑफर! 'द वॅक्सिन वॉर' न पाहिलेल्यांसाठी सुवर्णसंधी, एका तिकीटावर एक तिकीट फ्री

The Vaccine War: द वॅक्सिन वॉर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Pooja Dange

Special Offer On The Vaccine War Tickets:

विवेक अग्नीहोत्री यांचा द वॅक्सिन वॉर हा चित्रपट अंनत चतुर्थीदिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, सप्तमी गौडा, राइमा सेन, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य आणि मोहन कपूर हे कलाकार आहेत.

चित्रपटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मोठी घोषणा केली आहे.

द वॅक्सिन वॉर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. विवेक अग्नीहोत्री सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले आहे की द वॅक्सिन वॉर चित्रपटाचे एक तिकीट विकत घेतल्यावर एक तिकीट फ्री मिळणार आहे.

विवेक अग्नीहोत्री यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मित्रांनो, आज रविवार आणि सोमवार गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने तुमच्या कुटुंबासह द वॅक्सिन वॉर बघायला जा आणि एक तिकीट मोफत मिळवा. हे तिकीट तुमच्या घरातील एखाद्या स्त्रीला द्या.'

'द वॅक्सिन वॉर' चित्रपटाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. असे असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकलेला नाही. या चित्रपटाने चार दिवसात फक्त ५ कोटींची कमाई केली आहे.

पहिल्या दिवशी चित्रपटाने १.३० कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी २.२० कोटींची कमाई केली आहे. 'बाय वन गेट वन' ऑफरचा काल या चित्रपटाला फायदा झाला असे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT