Virat Kohli, Anushka Sharma  Instagram @anushkasharma
मनोरंजन बातम्या

Virat Kohli-Anushka Sharma: विराट-अनुष्काच्या घरी पुन्हा दुसऱ्यांदा हलणार पाळणा? मात्र बाळाचा जन्म भारतात नाही या देशात होणार

Virat Kohli Anushka Sharma News: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. विराट- अनुष्का पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. यानंतर आता विराट अनुष्काचे बाळ भारतात नव्हे तर परदेशात जन्म घेणार असल्याचेही बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Virat Kohli Anushka Sharma Second Child Born In London

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय कपल आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा चर्चेत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी लवकरच नवीन पाहुण्यांचे आगमन होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. अशातच अनुष्का आणि विराट भारतात नव्हे तर परदेशात नवीन पाहुण्याचे स्वागत करणार असल्याची चर्चा होत आहे. (Latest News)

काही दिवसांपूर्वी अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यात अनुष्काचे बेबी बंप दिसत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळेच अनुष्का लवकरच आई होणार असल्याचे सांगण्यात सांगण्यात येत होते. याबाबत विराट- अनुष्काने कोणतीही घोषणा केलेली नाही. यानंतर लवकरच अनुष्का बाळाल जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. तर अनुष्का भारतात नाही तर परदेशात बाळाला जन्म देणार असल्याचे समोर आले आहे.

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी अनुष्का शर्माच्या डिलिव्हरीबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 'हो, काही दिवसानंतर लहान बाळाचे स्वागत होणार आहे. आता तो वडिलांप्रमाणे क्रिकेटर होतो की आईप्रमाणे इंडस्ट्रीत काम करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. #madeInIndia #ToBeBornInLondon' असं कॅप्शन दिले आहे. त्यामुळेच अनुष्का आणि विराटच्या बाळाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याच्या चर्चा आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने याआधी २०२० मध्ये गरोदरपणाची बातमी दिली होती. अनुष्काने जानेवारी २०२३ ला वामिकाला जन्म दिला. त्यानंतर आता पुन्हा विराट- अनुष्का आईबाबा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT