Virat-Anushka SAAM TV
मनोरंजन बातम्या

Virat-Anushka : हातात हात अन् चेहऱ्यावर स्माइल; परदेशी मॉडेलच्या फोटोवरून चर्चेत आलेला विराट कोहली बायकोसोबत दिसला, VIDEO व्हायरल

Virat Kohli- Anushka Sharma Viral Video : परदेशी मॉडेलचा फोटो लाईक केल्यानंतर पहिल्यांदाच विराट-अनुष्का एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

अलिकडेच विराट कोहलीने परदेशी मॉडेलचा फोटो लाईक केला.

परदेशी मॉडेलच्या फोटोवरून चर्चेत असलेला विराट बायकोसोबत स्पॉट झाला.

विराट-अनुष्काचा एक क्यूट व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गेल्याकाही दिवसांपासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे चांगलेच चर्चेत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रविवारी विराट आणि अनुष्का एअरपोर्टवर स्पॉट झाले. जर्मन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर 'LizLaz' हिने पोस्ट केलेल्या एका फोटोला विराट कोहलीने लाईक केल्यामुळे जो ऑनलाइन वाद निर्माण झाला होता, त्यानंतर विराट-अनुष्का पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघे एअरपोर्टबाहेर पडताना दिसले. विराट कोहलीने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. तर अनुष्काने फ्लोरल प्रिंट कुर्ता आणि त्याला मॅचिंग पलाझो पँट परिधान केली होती. त्यावर हिरव्या रंगाचा दुपट्टा तिने घेतला होता. अनुष्का साध्या सिंपल लूकमध्येही खूपच सुंदर दिसत होती. व्हिडीतोत दोघे एकमेकांशी हसत बोलताना दिसले तसेच विराटने अनुष्काची बॅग देखील घेतली.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिलं की, "किती क्युट जोडी आहे ही..." तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "विराट-अनुष्का वृंदावनला जात आहेत वाट..." या व्हिडीओनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मामध्ये सर्वकाही छान चालू असल्याचे दिसून येते. 2017 ला विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मुलांची नावे वामिका (मुलगी) आणि अकाय (मुलगा) आहेत.

काही दिवसांपासून इन्फ्लुएन्सर 'LizLaz'च्या पोस्टला विराट कोहलीने केलेला लाईक चर्चेचा विषय बनला. अखेर LizLaz ने क्रिकेटपटूने आपल्या फोटोला 'लाईक' करणे आणि नंतर ते 'अनलाईक' करणे यावर आपले मौन सोडले. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, LizLaz म्हणाली, "खरं तर, मला त्याच्याबद्दल थोडी सहानुभूती वाटली. त्याने माझ्या फोटोला लाईक केले याचा मला खूप आनंद झाला होता; पण नंतर त्याने ते अनलाईक केल्यावर, मला त्याच्यासाठी थोडं वाईट वाटलं. कारण, या गोष्टीची इतकी मोठी बातमी कशी बनली, हे मलाच समजत नाहीये. कदाचित त्याचा तसा काहीच उद्देश नसावा; तरीही मी याबद्दल कृतज्ञ आहे आणि त्याने दिलेल्या अप्रत्यक्ष पाठिंब्याचे मी कौतुक करते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात गंभीर कारणे

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

SCROLL FOR NEXT