Shilpa Shetty  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty: शिल्पा पापाराझींवर भडकली, म्हणते 'आता तोंडात जाऊन?...'

शिल्पा अनेकदा बाहेर फिरताना किंवा घरातून बाहेर पडताना पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी ठिय्या मांडून असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश स्टार्सपैकी एक आहे. शिल्पा तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत आहे. जेव्हा ती घरातून बाहेर पडते तेव्हा पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी ठिय्या मांडून असतात. शिल्पा अनेकदा बाहेर फिरताना दिसते. तिचा एअरपोर्ट लूक असो किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरतानाचा लूक ती नेहमीच ग्लॅमरस दिसत असते. शिल्पा तिच्या फॅशन सेन्सने सर्वांनाच प्रभावित करते.

बुधवारी दुपारी शिल्पा सुपर स्टायलिश लूकमध्ये पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि सिल्व्हर शिमरी पॅन्ट घातली होती. तिच्या कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पापाराझींना तिची विचित्र टिप्पणी फारच महागात पडली. जे पापाराझी तिला फोटो काढण्यासाठी थांबवत होते, त्यांच्यावर शिल्पा चांगलीच संतापली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, शिल्पाला कॅमेरामॅनने तिच्या कारसमोर थांबायला सांगितले. त्यावर शिल्पा शेट्टीने लगेच उत्तर दिले, 'तोंडात घुसून फोटो काढता का?'. संतापलेल्या शिल्पाचा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला. व्हिडिओवर हसणारे इमोजी शेअर करत चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शेट्टी कुंद्राचेही इंस्टाग्रामवर प्रचंड चाहते आहेत. वेळोवेळी, चाहत्यांसोबत सुंदर फोटो, व्हिडिओ इत्यादीद्वारे तिच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देते. वर्क फ्रंटवर, शिल्पा शेट्टी कुंद्रा पुढे 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय हे देखील आहेत. ही वेबसीरिज 'Amazon Prime Video' वर स्ट्रीम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT