
Bigg Boss 16 Episode Update: टीव्हीवरील जगतातील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस 16'. या शोमध्ये मारामारी आणि भांडणे नेहमीच पाहायला मिळत असतात. शोमध्ये दररोज स्पर्धक नवनवीन कृत्य करतात त्यामुळे घरात गोंधळ निर्माण होतो. सुरुवातीपासूनच अर्चना गौतमने कुटुंबातील इतरांचे जगणे कठीण करून ठेवले आहे. आता तिच्या वागण्याने सगळेच नाराज झाले आहेत. आता अर्चनाने कर्तव्य न बजावल्याने घरातील वातावरण पुन्हा एकदा बिघडले आहे.
साजिद खान या आठवड्यात कॅप्टन म्हणजेच राजा बनला आहे. त्याने सर्व स्पर्धकांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या खोल्या दिल्या आहेत. रॉयल शेफ आणि राजाची खास माणसे वगळता सगळ्यांना घरातील कामे करावी लागतात. पण आता अर्चना गौतम घरातील कामे करण्यास नकार देत आहे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचा पारा चढला आहे.
या भागाचा प्रोमो नुकताच कलर्स मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, साजिद अर्चनाला सांगतो की तिला काम करावे लागेल आणि जर तिने तसे केले नाही तर तिला शिक्षा होईल. यावर प्रियंकाही साजिदला पाठिंबा देत म्हणते की, जर तुम्ही घरातील कामे करू शकत नाही तर तुम्ही घरामध्ये राहू शकत नाही. (Social Media)
अर्चनाच्या वागण्याने संपूर्ण घर त्रस्त आहे. साजिद शिव ठाकरेला अर्चनाचे सामान बाहेर फेकण्याचा आदेश देतो. शिव अर्चनाला यावर काम करण्यासाठी 20 मिनिटे देतो. पण अर्चना म्हणते की, 'ती तिला वाटेल ते ती करेल.' यावर कुटुंबातील सर्व सदस्यांनी ठरले की यापुढे अर्चनाची मनमानी सहन करणार नाही. शिव आणि अंकित मिळून अर्चनाचा बेड पूर्णपणे खराब करतात. मग सर्व कपडे उचलून बाहेर तुरुंगात टाकतात. आता घरातील सदस्य आणि अर्चना यांच्यात कर्तव्याची चर्चा कुठपर्यंत पोहोचते हे पाहावे लागेल. (TV)
या सीझनमध्ये स्पर्धक अनेकदा खुलेआम सिगारेट ओढताना दिसले आहेत. बिग बॉसच्या अनेक इशाऱ्यांनंतरही जेव्हा स्पर्धकांमध्ये सुधारणा झाली नाही तेव्हा बिग बॉसने त्यांना शिक्षा केली. 'बिग बॉस'च्या वतीने सिगारेटची खोली बंद करून त्यावर 'आम्ही मूर्ख आहोत' असे लिहिण्यात आले आहे. यानंतर सर्व स्पर्धक प्रेक्षकांची माफी मागताना दिसले आहेत. (Bigg Boss)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.