Vikrant Massey Yandex
मनोरंजन बातम्या

Vikrant Massey :12th फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सीचा खुलासा; अभिनयातून ब्रेक घेण्याचं 'हे' आहे खरं कारण...

Vikrant Massey : ‘12th फेल’ फेम बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने करियर टर्निंग पॉईंटवर असताना अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णय का घेतला या प्रश्नाचे उत्तर दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vikrant Massey : 12th फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सी हा त्याच्या अभिनयासाठी तसेच त्याच्या चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखला जातो. विक्रांतने आपल्या अभिनयाची सुरुवात हिंदी टेलिव्हीजनपासून केली त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. 12th फेल फैल नंतर त्याच्याकडे असंख्य काम येत आहेत. पण काही दिवसांपूर्वी अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णया घेतला. एवढ्या कमी वयात आणि एवढ्या लवकर अभिनयातून ब्रेक घेण्याच्या त्याच्या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता विक्रांतने करियर महत्वाच्या टप्यावर असताना एवढा मोठा निर्णय का घेतला ? या प्रश्नाचे उत्तर दिल आहे.

एका मुलाखतीत अभिनेता विक्रांत मेस्सीने सांगितले की, “अभिनयातून ब्रेक घेण्याचा मी माझ्या जीवनात केव्हाच विचार केला नव्हता. 12th फेल चित्रपट केल्यानंतर सर्वत्र माझ्या कामाचे कौतुक करण्यात आले. मला आयुष्यात एकदा तरी फिल्मफेअर मिळवण्याचे माझे स्वप्न होते, तेही मला मिळाले. माझ्यासारख्या मिडलक्लास कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला देशाच्या पतंप्रधानांसोबत भेट होणे शिवाय पंतप्रधानांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांसोबत एकत्र बसून आपला चित्रपट पाहणं ही फार मोठी गोष्ट आहे.”

सोशल मीडियाचा दबाव

विक्रांत मेस्सीने अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाची पोस्ट केल्यानंतर लगेचच दुसऱ्यादिवशी त्याने हा निर्णय मागे घेतल्याचेही पाहायला मिळाले. विक्रांतने त्याला आलेल्या धमकीमुळे त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत असल्याचे सांगत हा अभिनय सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.मात्र आता त्याने अशी पोस्ट का केली? याचं वेगळच कारण सांगितलं आहे. विक्रांतच्या व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले आहे. त्याने ब्रेक घेण्यामागे किंवा अशी पोस्ट करण्यामागे सोशल मीडियाचा दबाव असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तसेच, विक्रांतने यावेळी त्याच्या करिअरचा त्याच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांवर भाष्य केले. विक्रांत म्हणाला, “शारिरीकदृष्ट्या मी पूर्णपणे थकलो आहे. या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताना सगळ्याच गोष्टीचे संतुलन राखण मला अवघड जात आहे. मी त्या पोस्टमध्ये जरा जास्तच इंग्रजी लिहिली होती. त्यामुळे प्रत्येकाला मी नक्की काय लिहिलंय हे समजलं नाही आणि अनेकांचा गैरसमज झाला आहे.” इंग्रजीत लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे काही गोंधळ निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT