Vikram Veda  Saam Tv
मनोरंजन बातम्या

ह्रतिक-सैफचे थरारक अॅक्शन सीन, 'बंदे' गाणं लावणार 'याड'

नुकतंच चित्रपटातील एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan)आणि अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) त्यांच्या बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक शेअर केला होता. तो चाहत्यांना प्रचंड भावला आहे.

नुकतंच चित्रपटातील एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विक्रम वेधाच्या (VikramVedha) निर्मात्यांनी या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित केले आहे. 'बंदे' असे या गाण्याचे शीर्षक असून, ते चित्रपटातील मुख्य गाणं आहे.

बंदे हे गाणं चोर-पोलिसांच्या जुगलबंदीवर आहे. गाण्यातील प्रत्येक सेकंदानंतर बॅकग्राउंडला बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आहे, जो अत्यंत भयानक वाटतो. गाण्यामधील अॅक्शन सीन्स थरारक आहेत. गाण्याला सैफ आणि हृतिक या दोघांच्या संघर्षांची पार्श्वभूमी आहे. विजांच्या तारांवरून जाणारा हृतिक आणि दिवसाढवळ्या गोळीबार करणारा पोलीस अधिकारी सैफ अशा खतरनाक अॅक्शन सीन्सने भरलेला हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निर्मात्यांनी यापूर्वी 'अल्कोहोलिया' हे गाणे प्रदर्शित केले होते, ज्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. हृतिकच्या डान्सने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. विक्रम वेधा हा तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खानसह रोहित सराफ, राधिका आपटे यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

विक्रम वेधा हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. विक्रम वेधाची कथा पूर्णत: सस्पेन्स आहे. 'विक्रम वेधा' हे गुलशन कुमारच्या टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ तसेच वाय नॉट स्टुडिओ प्रॉडक्शनच्या बनरखाली तयार झालेला चित्रपट आहे. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित, भूषण कुमार आणि एस शशिकांत निर्मित 'विक्रम वेधा' चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हृतिक रोशन आणि सैफ अली खान याआधी २००२ मध्ये 'ना तुम जानो ना हम' या चित्रपटात एकत्र दिसले होते. पुन्हा एकदा ही दमदार जोडी विक्रम वेधामध्ये दिसणार आहे, ज्याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT