Rashmika Vijay viral Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay: 'प्रत्येकाच्या आयुष्यात विजय असावा...'; लग्नाच्या चर्चांमध्ये विजयने केलं रश्मिकाला किस, पाहा व्हायरल VIDEO

Rashmika-Vijay viral Video: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकमेकांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता, लग्नाच्या अफवांदरम्यान, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाचा एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Rashmika-Vijay viral Video: गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या बातम्या बी-टाउनमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत. दरम्यान, काल रात्री रश्मिका मंदान्नाच्या "द गर्लफ्रेंड" चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विजय देवरकोंडा देखील उपस्थित होता. यावेळी दोघांमध्ये एक प्रेमळ क्षण पाहायला मिळाला, जेव्हा विजयने रश्मिकाला किस केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता समोर येत आहेत. कार्यक्रमादरम्यान, रश्मिकाने विजयचे खूप कौतुक केले आणि म्हटले की प्रत्येकाच्या आयुष्यात एक विजय असावा.

कार्यक्रमाच्या गर्दीत विजय देवरकोंडाने रश्मिकाचा हात धरला आणि पहिल्यांदाच अभिनेत्रीशी असलेली जवळीक जाहीरपणे दाखवली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये विजय रश्मिकाच्या हाताला खूप प्रेमाने किस करताना दिसत आहे. विजयच्या या कृतीवर रश्मिका लाजते. यावेळी विजयच्या डोळ्यात रश्मिकाबद्दलचे प्रेम दिसत आहेत.

रश्मिकाने विजयचे खूप कौतुक केले

हैदराबादमध्ये "द गर्लफ्रेंड" चित्रपटाच्या सक्सेस कार्यक्रमात रश्मिकाने चित्रपटाबद्दल सांगितले. चित्रपटाच्या प्रवासाबद्दल चर्चा करताना, रश्मिकाने विजयचे कौतुक केले आणि त्याच्या पाठिंब्याबद्दल त्याचे आभार मानले. विजयला प्रेमाने "विजू" म्हणत रश्मिका म्हणाली, "विजू, तू सुरुवातीपासूनच या चित्रपटाचा भाग आहेस आणि चित्रपटाच्या यशाचा तू एक भाग आहेस. मी फक्त अशी आशा करू शकते की प्रत्येकाच्या आयुष्यात विजय असावा, कारण तो एक आशीर्वाद आहे." रश्मिकाने विजयचे नाव घेताच, प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

यावेळा रश्मिकाला प्रेमाने "रशी" म्हणत विजय म्हणाला, "मला तुझा अभिमान आहे, रशी." तू अशी मुलगी आहेस जी आज उत्तम पटकथा निवडत आहेस. कारकिर्दीच्या शिखरावर असताना, तूला द गर्लफ्रेंड सारख्या कथा सांगायच्या आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान, रश्मिका किती प्रेक्षक तो पाहण्यासाठी येतील हा विचार न करता ही गोष्ट प्रेक्षकांना कळली पाहिजे हा तुझा उद्देश कौतुकास्पद आहे. रश्मिका, तुझ्या प्रवासासाठी, तुझ्या मेहनतीसाठी आणि तू कोण आहेस याबद्दल मला तुझा अभिमान आहे.

रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चा

गेल्या महिन्यात, रश्मिका आणि विजयचा साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण, रश्मिका आणि विजयने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबत विविध अफवा पसरत आहेत. वृत्तांनुसार हे कपल २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

जैन बांधव शिवसेनेसोबत, फडणवीसांच्या जवळ गद्दार नेते

Maharashtra Politics: शिंदे गटात अंतर्गत नाराजी उफाळली; उल्हासनगरमधील 200 हून अधिक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

चर्चेच्या फेऱ्या सुरु, घोळ संपता संपेना, भाजप शिंदेसेनेचे इच्छूक गॅसवर?

Mumbai Crime News: मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला

SCROLL FOR NEXT