विद्युत जामवाल आणि नंदिता महतानीने लग्न केले?; पाहा व्हायरल फोटो Instagram
मनोरंजन बातम्या

विद्युत जामवाल आणि नंदिता महतानीने लग्न केले?; पाहा व्हायरल फोटो

बॉलिवूडमध्ये अॅक्शन स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विद्युत जामवालविषयी (Vidyut Jammwal) बातमी समोर आली आहे.

वृत्तसंस्था

बॉलिवूडमध्ये अॅक्शन स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विद्युत जामवालविषयी (Vidyut Jammwal) बातमी समोर आली आहे. त्याने डिझायनर नंदिता महतानीशी लग्न केले आहे. दोघांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात ते ताजमहाल फिरताना दिसत आहेत. विद्युत आणि नंदिताची अनेक फोटो फॅन पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. फोटोंमधून दोघे एकत्र पोज देताना दिसत आहेत. नंदिताच्या हातातली अंगठी पाहून अंदाज लावला जातोय की त्यांनी दोघांनी लग्न केले आहे.

विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. दोघेही इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहेत आणि त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ खूप शेअर करत असतात. विद्युतने आपले प्रॉडक्शन हाऊस सुरू केले तेव्हाही नंदिताने त्यांचे अभिनंदन केले होते. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियानेही या दोघांचा फोटो व्हायरल होत असल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

अलीकडेच विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात त्याची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली होती. जम्मूमध्ये जन्मलेला विद्युत जामवाल हा केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर एक अद्भुत मार्शल आर्टिस्ट आणि स्टंट परफॉर्मर देखील आहे. बॉलिवूडबरोबरच त्याने टॉलीवुड आणि कॉलीवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त विद्युत जामवाल, तुमहे दिल्लगी आणि गल बन गयी ही दोन गाणीही खूप हिट झाली. या सर्वांशिवाय, विद्युत जामवाल यांना चित्रपटांमध्ये त्यांच्या दमदार अभिनयासाठी झी सिने पुरस्कार, आयफा आणि फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT