Vidya Balan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vidya Balan: 'भूल भुलैया 2'साठी विद्या बालनने दिला होता नकार, कारण स्वत: सांगितले, म्हणाली...

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' हा चित्रपट करण्यास विद्या बालनने नकार दिला होता. तिच्या नकारामागचे कारण जाणून घ्या.

Shreya Maskar

दिवाळीच्या मुहूर्तावर 'भूल भुलैया 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भूल भुलैया 3' 1 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 'भूल भुलैया 3'हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. भूल भुलैया या चित्रपटात विद्या बालन पाहायला मिळाली होती. मात्र 'भूल भुलैया 2' मध्ये (Bhool Bhulaiyaa 2) विद्या बालन दिसली नाही. आता पुन्हा एकदा'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तिने मंजुलिकाची भूमिका साकारली आहे. 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालनसोबत आपल्याला माधुरी दीक्षित देखील पाहायला मिळत आहे.

'भूल भुलैया 3' च्या 'आमी जे तोमार 3.0' या गाण्याच्या लाँचवेळी अनेक खुलासे केले गेले. तेव्हा निर्माते भूषण कुमार म्हणाले की, "मी 'भूल भुलैया 2'साठी देखील विद्या बालनला संपर्क केला होता. पण तिनेच चित्रपट करण्यास नकार दिला. तेव्हा मी तिला 'भूल भुलैया 2'च्या ट्रेलर लाँचसाठी बोलावले होते, तेव्हा तिने ट्रेलर पाहिला आणि तिला तो खूप आवडला देखील होता. तेव्हा विद्या मला बोली होती की, मी तिसरा सिनेमा नक्कीच करेल."

पुढे या संदर्भात विद्या बालन (Vidya Balan) म्हणाली की, मी भूल भुलैया केल्यानंतर खूप घाबरले होते. या चित्रपटाने मला खूप काही दिलं आहे. जेव्हा 'भूल भुलैया 2'साठी मला विचारण्यात आलं तेव्हा माझ अस झालं की, मी काही चूक केली तर या सगळ्यावर पाणी फिरेल. मला रिस्क नको होती. मात्र जेव्हा मी 'भूल भुलैया 3'ची स्क्रिप्ट वाचली तेव्हा ती मला खूप जास्त आवडली. मला अनीस आणि भूषणसोबत काम करायचे होतेच. त्यात माधुरी दीक्षितही होती. त्यामुळे मी 'भूल भुलैया 3'ला होकार दिला. 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radha Yadav Catch: ही राधा 'बावरी' नायतर 'सुपरवुमन' हाय! हवेत झेपावत घेतला अफलातून कॅच - VIDEO

Diwali 2024: दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? घरात येईल सुख-समृद्धी

Maharashtra News Live Updates : चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी; भाजप नेते शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Ranji Trophy: BCCI चा ढिसाळ कारभार! खेळपट्टी सुकवण्यासाठी करावा लागतोय देसी जुगाड - Photo

Nashik News : नाशिक मध्यच्या जागेवरून अजूनही संभ्रम; उबाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT