vidya balan instagram
vidya balan instagram Saam Tv
मनोरंजन बातम्या

विद्या बालन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीझन ७' मध्ये? मजेशीर व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन(Vidya Balan) चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती पुढे काय करणार आहे आणि सध्या काय करत आहे याबद्दल ती तिच्या(Social Media) सोशल मीडियावर पोस्टद्वारे चाहत्यांना सांगत असते. दरम्यान, तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर नवीनतम व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याबद्दल सोशल मीडिया युजर्स आणि अभिनेत्रीचे चाहते असा अंदाज लावत आहेत की विद्या लवकरच करण जोहरच्या टॉक शो 'कॉफी विथ करण सीझन ७' मध्ये सहभागी होणार आहे.

विद्या बालनने तिच्या नवीनतम पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लाल रंगाच्या पोशाखात दिसत आहे. व्हिडिओमध्ये, ती बोलते, "तुम्ही गप्पा मारत असाल तर, किमान तुम्ही खरोखर चांगले कपडे घातले आहेत याची खात्री करा. तुम्ही एकाच वेळी खराब कपडे घालून वायफळ बोलू शकत नाही."

विद्याने तिच्या पोस्टमध्ये, करणच्या शोशी संबंधित काहीही लिहिले नाही, परंतु अशी अटकळ आहे की ती करणच्या शोमध्ये सहभागी होऊ शकते. चाहत्यांची अटकळ खरी ठरली तर विद्या बालन तिसऱ्यांदा करणच्या शोमध्ये जाणार आहे. याआधी ती दोनदा करणच्या शोमध्ये उपस्थित राहिली होती. २०११ च्या सीझन ३ मध्ये, विद्या बालनने राणी मुखर्जीसोबत चॅट शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर २०१४ च्या सीझन ४ मध्ये फरहान अख्तरसोबत सहभागी झाली होती.

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे तर, ती आगामी काळात अभिनेता प्रतीक गांधीसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. यासोबतच ती सोनाक्षी सिन्हासोबत 'डबल एक्सेल' या चित्रपटात दिसणार आहे. सागरिका घोष यांच्या 'इंदिरा: इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर' या चरित्रावर आधारित वेब सीरिजमध्ये विद्या बालन माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिकाही साकारणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malshejh Ghat Accident News: माळशेज घाटात भीषण अपघात! दूध टँकर आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई! अनेक गावातील अवस्था अत्यंत बिकट

Onion Price Hike: शेतकऱ्यांना अच्छे दिन! निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वधारले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका दर

Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Today's Marathi News Live : सांगलीत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT