Vicky Kaushal-Ranbir Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal-Ranbir Kapoor : विकी-रणबीर यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास; लोक मागे वळून पाहू लागले, पाहा VIDEO

Vicky Kaushal-Ranbir Kapoor VIDEO : विकी कौशल आणि रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसत आहेत.

Shreya Maskar

विकी कौशल आणि रणबीर कपूरचा 'लव्ह अँड वॉर'चे सध्या शूटिंग सुरू आहे.

विकी कौशल आणि रणबीर कपूर यांना विमानात एकत्र स्पॉट करण्यात आले.

विकी कौशल आणि रणबीर कपूरला विमानात पाहून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

सध्या बॉलिवूडचे दोन सुपरस्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्यांचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर'मुळे (Love and War) चांगलेच चर्चेत आहेत. कलाकार चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. गेले अनेक दिवस विकी कौशल आणि रणबीर कपूर एकत्र स्पॉट होत आहेत. अशात त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये विकी कौशल आणि रणबीर कपूर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईला परत येताना दिसत आहे. त्यांचा विमानातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसले. विकी कौशल आणि रणबीर कपूर अचानक इकॉनॉमी क्लासमध्ये दिसल्यामुळे प्रवाशांना आनंदाचा धक्का बसला आहे.

विकी कौशल आणि रणबीर कपूर आपले राजस्थानमधील शूटिंग पूर्ण करून मुंबईला जात होते. तेव्हा विमानात त्यांना पाहून प्रवाशांना प्रवासी आश्चर्यचकित झाले. प्रवाशांनी विकी कौशल आणि रणबीर कपूर फोटो आणि व्हिडीओ काढले.जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांना दोघांचाही साधा-भोळा स्वभाव खूप आवडला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विकी कौशल आणि रणबीर कपूरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

लव्ह अँड वॉर

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'लव्ह अँड वॉर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे, रणबीर आणि आलिया यांचा ब्राम्हस्त्र नंतर हा दुसरा एकत्र चित्रपट आहे. 'लव्ह अँड वॉर' हा एक रोमँटिक-ड्रामा असून हा एक हिस्टोरिकल ड्रामा आहे. संजय लीला भन्साळी यांची खास शैली, भव्य सेट्स आणि क्लासिक संगीताची जोड असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक संस्मरणीय अनुभव ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमधील महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा दौरा पुढे ढकलला

Kantara Chapter 1 Trailer Out: रहस्यमयी अन् गूढ कहाणी; अंगावर शहारे आणणारा 'कांतारा चॅप्टर 1'चा ट्रेलर पाहिला का?

Tuesday Horoscope : तुमच्या जवळच्या लोकांना प्रगती बघवणार नाही; ५ राशींच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागणार

Gujrat Viral News: पोलिसांच्या व्हॅनवर १० मिनिटे अश्लील चाळे, गर्लफ्रेंड अन् बॉयफ्रेंडचा नको 'तो' प्रकार, Video होतोय व्हायरल

Kalyan APMC Market : कल्याणमध्ये घोटाळ्याचा बाजार; समितीत आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा

SCROLL FOR NEXT