Vicky kaushal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky kaushal: 'छावा' चित्रपटाच्या सेटवरून विकी कौशलचा फोटो लीक; जबरदस्त लूक पाहून चाहते चकीत

Vicky Kaushal Chhava Movie Photo: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. विकी कौशल उरी, सॅम बहादूर अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. विकी कौशल उरी, सॅम बहादूर अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरु आहे. याच चित्रपटाच्या सेटवरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटातील विकी कौशलचा लूकचा फोटो लीक झाला आहे.

बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर नवीन चित्रपट बनवण्यात येत आहे. चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटातील विकी कौशलचा लूक रिव्हिल झाला आहे.

झूम टीव्हीने इन्स्टाग्राम पेजवरुन हा फोटो शेअर केले आहे. या फोटोत विकी कौशलने संभाजी महारांजासारखा पोषाख परिधान केला आहे. विकीने कपाळाला गंध, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कवड्याची माळ, कमरेला शेला, लेहंगा असा लूक केला आहे. सोशल मीडियावर या फोटोंची खूप चर्चा होत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विकीचा हा नवीन चित्रपट पाहण्यासाठी आतुर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

'छावा' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना खूप जास्त उत्सुकता आहे. चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रश्मिका मंदानादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच आशिष पालांडे, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT