७ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ प्रदर्शित झाला आणि शाहरुखची प्रचंड चर्चा सुरु झाली. अवघ्या काही दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटले तरी चित्रपट अजूनही यशस्वी घोडदौड करीत आहे. जगभरात चित्रपटाच्या कमाईचा आकडा 938 कोटींच्या पुढे गेला असून भारतात चित्रपटाने 632.25 कोटींची कमाई केली आहे. नुकताच या आठवड्यामध्ये बॉक्स ऑफिसवर दो नवे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण पहिल्याच दिवसाची चित्रपटाची कमाई फारच निराशाजनक आहे.
विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. २२ सप्टेंबरला दोन्हीही चित्रपट प्रदर्शित झाले होते. दोन्ही वेगवेगळ्या धाटणीचे असलेले हे चित्रपट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत. दमदार कलाकारांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटांनी पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली आहे.
शिल्पाच्या ‘सुखी’ने पहिल्या दिवशी केवळ ३० लाखांचीच कमाई केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी फार मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुन:रागमन केलं आहे. पण तरीही शिल्पाच्या या चित्रपटाने खास जादु दाखवलेली नाही.
विकी कौशलच्या ‘जरा हटके जरा बचके’ने प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं आहे. आपल्या विनोदी आणि गंभीर भूमिकेने विकीने कायमच चाहत्यांचे मनोरंजन केले. नुकताच विकीचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक महत्वाचा संदेश दिला आहे.
पण तरीही प्रेक्षकांना चित्रपट इतका आवडलेला नाही. शाहरुख खानच्या ‘जवान’समोर विकीचा आणि शिल्पाचा चित्रपट काही खास कमाल करू शकलेला नाही. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ने च्या पहिल्या दिवशी १.४० कोटींचा गल्ला जमावला आहे.
विकी कौशल आणि मानुषी छिल्लरच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विकी कौशलसोबत मानुषी छिल्लर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा आणि यशपाल शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.
शाहरुखचा ‘जवान’ तिसऱ्या विकेंडलाही सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून चर्चेत आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ ‘पठान’ला मागे टाकेल का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाने भारतात आतापर्यंत ५४४ कोटींचा टप्पा गाठला आहे, तर जगभरात चित्रपटाने ९३७.६१ कोटींचा टप्पा गाठला आहे. शाहरुख खानने ‘पठान’ आणि 'जवान' या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या माध्यमातून त्याने रुपेरी पडद्यावर जोरदार पुनरागमन केले आहे. शाहरुखचा २०२३ मधील ‘डंकी’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. येत्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.