veteran theater director vijaya mehta passes away Saam tv
मनोरंजन बातम्या

Director Death: मराठी रंगभूमीवरील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Marathi Director Death: मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिकाचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाट्यविश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Shruti Vilas Kadam

Marathi Director Death: मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, प्रयोगशीलता आणि शिस्तीची नवी दिशा देणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक विजया मेहता यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून, रंगभूमीने आपल्या एका युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे.

४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा येथे जन्मलेल्या विजया मेहता यांचे पूर्वीचे नाव विजया जयवंत होते. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. पुढे दिल्लीतील National School of Drama येथे त्यांनी नाट्यशिक्षण घेतले. प्रख्यात नाट्यगुरू इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाची भक्कम पायाभरणी केली.

मराठी रंगभूमीवर 'बाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी 'रंगायन' या नाट्यचळवळीची स्थापना करून प्रायोगिक रंगभूमीला नवे परिमाण दिले. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणातून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले. रंगमंचावरील प्रत्येक घटकाचा बारकाईने विचार करणाऱ्या दिग्दर्शिका म्हणून त्यांची ओळख होती.

अभिनेत्री म्हणून त्यांनी 'झुंजारराव', 'संशयकल्लोळ', 'तुझे आहे तुजपाशी' आणि 'सुंदर मी होणार' यांसारख्या नाटकांत प्रभावी भूमिका साकारल्या. दिग्दर्शिका म्हणून 'संध्याछाया', 'हमीदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'सावित्री', 'पुरुष', 'वाडा चिरेबंदी' यांसारख्या गाजलेल्या नाटकांना त्यांनी नवे कलात्मक रूप दिले. भारतीय रंगभूमीबरोबरच जर्मनीतही 'मुद्राराक्षस', 'शाकुंतल', 'हयवदन' आणि 'नागमंडल' यांसारख्या नाटकांचे यशस्वी प्रयोग सादर करून त्यांनी भारतीय नाट्यकलेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे 'झिम्मा : आठवणींचा गोफ' हे त्यांचे आत्मचरित्रही रसिकांनी मोठ्या प्रमाणावर वाचले.

त्यांनी रंगभूमीसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान, विष्णुदास भावे सुवर्णपदक, पु. ल. देशपांडे पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरवण्यात आले. विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीतील एक सुवर्णपर्वाचा अंत झाला असला तरी, त्यांच्या कार्याचा ठसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT