Asha Bhosle Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asha Bhosle: आशा भोसलेंनी विकला पुण्यातील आलिशान अपार्टमेंट; ४२% पेक्षा जास्त झाला नफा, मिळाले कोट्यवधी रुपये

Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी पुण्यातील त्यांचे ३,४०१ चौरस फूट क्षेत्रफळाचे आलिशान अपार्टमेंट ६.१५ कोटींना विकले आहे.

Shruti Vilas Kadam

Asha Bhosle: सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी पुण्यातील मॅगरपट्टा परिसरात असलेला एक आलिशान फ्लॅट ६.१५ कोटी रुपयांना विकला आहे. 'पंचशील वन नॉर्थ' या प्रोजेक्टमधील हा फ्लॅट १९व्या मजल्यावर असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ ३,४०१ चौरस फूट आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटमध्ये १८२ चौरस फूटाचा खास टेरेस आणि पाच पार्किंग स्पॉट्सचा समावेश आहे.

हा फ्लॅट भोसले कुटुंबाने २०१३ साली सुमारे ४.३३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. सुमारे १२ वर्षांनंतर त्यांनी तो ६.१५ कोटींना विकला असून, त्यातून त्यांना अंदाजे ४२ टक्के परतावा मिळाला आहे. हा व्यवहार १४ जुलै २०२५ रोजी नोंदवण्यात आला असून, त्यासाठी ४३ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांचे नोंदणी शुल्क भरले गेले आहे.

या फ्लॅटचे खरेदी प्रेरणा गौंडेव आणि संग्राम गौंडेव यांनी केली असून पंचशील वन नॉर्थ हा प्रकल्प पुण्यातील प्रसिद्ध लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. आशा भोसले यांचा पुण्याशी अनेक वर्षांचा जुना संबंध असून, या व्यवहारामुळे त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

इमारतीचे स्थानिक वैशिष्ट्य

‘पंचशील वन नॉर्थ’ ही इमारत पंचशील रिअ‍ॅल्टी या कंपनीने बांधलेली आहे. ही इमारत पुणे विमानतळापासून 9 किमी, खराडीतून 6 किमी, हिंजवडी (IT हब) पासून 25 किमी अंतरावर आहे. या व्यवहाराबाबत आशा भोसले किंवा खरेदीदारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT