Veteran Bengali actress Mithu Mukherjee passes away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Actress Death: ‘मौचाक’ फेम ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री मिथू मुखर्जी यांचे ७१व्या वर्षी निधन झाले. कॅन्सरशी वर्षभर झुंज दिल्यानंतर मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shruti Vilas Kadam

Actress Death: बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिथू मुखर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या जवळपास वर्षभरापासून त्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बंगाली मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिथू मुखर्जी या १९७० आणि १९८०च्या दशकात बंगाली चित्रपटसृष्टीतील ओळखीचा चेहरा होत्या. अभिनयासोबतच त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्सचीही मोठी चर्चा होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तम कुमार, सौमित्र चट्टोपाध्याय आणि रंजीत मल्लिक यांसारख्या त्या काळातील आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले.

वयाच्या १७व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण

१९५५ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या मिथू मुखर्जी यांनी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. चित्ता बोस दिग्दर्शित ‘शेष पर्व’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर दिनेन गुप्ता यांच्या ‘मर्जिना अब्दुल्ला’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. पुढे त्यांनी ‘निशिकन्या’, ‘मौचाक’, ‘कबी’, ‘हॉटेल स्नो फॉक्स’, ‘प्रतिमा’, ‘बंधन’, ‘प्रार्थना’ आणि ‘स्वयंसिद्धा’ यांसारख्या बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयामुळे त्या त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

हिंदी चित्रपटांमध्येही उमटवला ठसा

मिथू मुखर्जी यांनी केवळ बंगाली चित्रपटांपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. १९७६ मध्ये दुलाल गुहा यांच्या ‘खान दोस्त’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर बासू चटर्जी दिग्दर्शित ‘सफेद झूठ’, तसेच ‘दिललगी’ आणि ‘दो लड़के दोनों कड़के’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या.

१९९० ठरला शेवटचा चित्रपट

१९८०च्या दशकात काही काळ अभिनयापासून दूर राहिल्यानंतर मिथू मुखर्जी यांनी ‘आश्रिता’ या चित्रपटातून १९९० मध्ये पुनरागमन केले. हा चित्रपट त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा ठरला. त्यानंतर त्यांनी मनोरंजनसृष्टीपासून दूर राहून अत्यंत खासगी आयुष्य जगणे पसंत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

SCROLL FOR NEXT