Usha Nadkarni Birthday Saam TV
मनोरंजन बातम्या

Usha Nadkarni Birthday: घराघरात पोहोचलेली 'खाष्ट सासू'; उषा नाडकर्णींचा फिल्मी प्रवासही तितकाच रंजक

HBD Usha Nadkarni: दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा १३ सप्टेंबरला वाढदिवस आहे.

Pooja Dange

Usha Nadkarni Birthday Special:

दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा १३ सप्टेंबरला वाढदिवस आहे. उषा नाडकर्णी म्हणजे आऊ यांचा जन्म १९४६ साली झाला आहे. उषा नाडकर्णी ७७ वर्षाच्या झाल्या आहेत. उषा नाडकर्णी यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांचा फिल्मी प्रवास.

उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात 'सिंहासन' या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे पाय घट्ट केले. १९८७ साली आलेल्या 'सडक छाप' या चित्रपटामध्ये उषा यांनी एका आंधळ्या महिलेची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले.

११९१ साली आलेल्या 'माहेरची साडी' या चित्रपटामध्ये त्यांनी एका खाष्ट सासूची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांना तसेच भूमिका मिळत गेल्या. १९९९ साली त्यांनी मालिकांमध्ये एन्ट्री केली आणि त्या घराघरात पोहोचल्या. (Latest Entertainment News)

२००९ साली झी वाहिनीवर आलेल्या पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून ही खाष्ट सासू देशभरात ओळखली जाऊ लागली. या मालिकेत सुष्ट सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होते. सुशांत म्हणजे मालिकेतील मानवच्या आईची भूमिका उषा नाडकर्णी यांनी साकारली होती.

'बिग बॉस सीजन १'

उषा नाडकर्णी या बिग बॉस मराठी पहिल्या सीजनमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांचा या घरातील वावर आणि खेळणे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या तडकेफड स्वभाव यावेळी प्रेक्षकांना प्रकर्षाने दिसला.

उषा नाडकर्णी यांनी संजय दत्तच्या 'वास्तव' या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. त्यांची या चित्रपटातील आईची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. या परखड स्वभावाच्या उषा नाडकर्णी यांची अभिनेत्री किंवा कलाकाराची व्याख्या खूप वेगळी आहे. त्यांच्या मते अभिनयासाठी सुंदर चेहरा आणि मेकअपची गरज नसते. अभिनयासाठी तुम्हाला ते पात्र नीट साकारता आलं पाहिजे.

उषा नाडकर्णी जितक्या खाष्ट आणि कडक दिसतात तितक्या त्या प्रेमळ आणि विनोदी आहेत. अशा सुंदर व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT