Famous Actor Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, कलाविश्वावर शोककळा

Actor Death : मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे.

जगप्रसिद्ध अभिनेते मार्शल आर्ट्सचे उस्ताद होते.

वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि मार्शल आर्ट्सचे उस्ताद ब्रूस लेउंग सिउ-लूंग यांच्या निधनामुळे हाँगकाँग चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 'कुंग फू हसल' चित्रपटातील 'द बीस्ट' या भूमिकेमुळे ब्रूस लेउंग सिउ-लूंग यांना लोकप्रियता मिळाली.

ब्रूस लेउंग सिउ-लूंग यांचे 14 जानेवारी 2026 ला निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मार्शल आर्ट्सचा वारसा ते जगासाठी सोडून गेले. ब्रूस लेउंग सिउ-लूंग यांच्या निधनाने जागतिक चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीत एका दिग्गज मार्शल आर्ट्स मास्टर आणि यशस्वी अभिनेत्याच्या निधनाबद्दल कलाकार, चाहते शोक व्यक्त करत आहे.

18 जानेवारी रोजी त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, ब्रूस लेउंग सिउ-लूंग यांचे चीनमधील शेन्झेन येथे निधन झाले. चाहते आता त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्याने अनेक मार्शल आर्ट्स चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात 1977 चा 'द ड्रॅगन लिव्हज अगेन' आणि जॅकी चॅनसोबतचा 1978 चा 'मॅग्निफिसेंट बॉडीगार्ड्स' यांचा समावेश आहे.

2004 मध्ये स्टीफन चो यांच्या 'कुंग फू हसल' या विनोदी चित्रपटातून त्यांनी खलनायक 'बीस्ट'च्या भूमिकेत दिसले. ज्यामुळे त्यांना तरुण चाहत्यांचा एक नवीन वर्ग मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, 26 जानेवारीला चीनमधील शेन्झेनच्या लाँगगँग जिल्ह्यात शोकसभा (Condolence meet ) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT