actor Sunil Anand passed away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death: बॉलिवूडवर शोककळा! देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Famous Actor Death: ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे सुपुत्र आणि अभिनेता सुनील आनंद यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Actor Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते देव आनंद यांचे सुपुत्र आणि अभिनेता सुनील आनंद यांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन झाले आहे. लंडनमध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सुनील आनंद हे अभिनेते, निर्माते आणि दिग्गज अभिनेते देव आनंद यांचे एकुलते एक चिरंजीव होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या आनंद और आनंद या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः देव आनंद यांनी केले होते. मात्र, वडिलांप्रमाणे मोठे स्टारडम त्यांना मिळू शकले नाही.

अभिनयासोबतच सुनील आनंद यांनी नवकेतन फिल्म्सच्या कामकाजातही महत्त्वाची भूमिका बजावली. चित्रपट निर्मिती, वितरण आणि वडिलांचा वारसा जपण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांनी ‘कार थीफ’, ‘मैं तेरे लिए’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून ते लंडनमध्ये वास्तव्यास होते. तेथेच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबाबतची माहिती समोर आल्यानंतर अनेक कलाकार, चाहते आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT