Mumbai, Ver  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Versova: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावाने बोगस फेसबुक अकाउंटवरून युवतींशी चॅटिंग करणाऱ्या इंजिनिअरला अटक

वर्सोवा पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

साम न्यूज नेटवर्क

Versova News : प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावाने फेसबुकवर बोगस अकाउंट खोलून मुलींची चॅटिंग करणाऱ्या इंजिनियरला वर्सोवा पोलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. आरोपी इंजिनियर शनामुगावडीवेल थणगावेल (३१) हा तामिळनाडू येथील रहिवासी असून वर्सोवा पोलिसांनी त्याला तामिळनाडू येथून अटक केली आहे. (Breaking Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीने प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावाने फेसबुकवर बोगस अकाउंट तयार केले होते. यावरून तो सिनेमात काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणींना काम देण्याचे कबूल करीत असे. त्यांच्याकडून बायोडाटा मागवून तरुणीशी संवाद साधत असे. (Maharashtra News)

त्यानंतर तरुणींकडून त्यांचे बोल्ड फोटो मागवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असे. ही बाब काही तरुणींनी दिग्दर्शक श्रीराम राघवन सुंदरा राघवन यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर राघवन यांनी यासंदर्भात वर्सोवा पोलिस स्टेशन येथे 23 मार्च रोजी तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य पाहून वर्सोवा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केले.

यांनतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हा परराज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वर्सोवा पोलिसांच्या एक पथकाने त्रीचोनगोड तामिळनाडू येथून संशियतास ताब्यात घेतलं. संबंधिताला न्यायायलायात (court) हजर करण्यात आल्यानंतर त्यास पोलीस काेठडी सुनावण्यात आली आहे. वर्सोवा पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT