Ved Marathi Movie Poster Instagram/ @riteishd
मनोरंजन बातम्या

Ved: परदेशी चाहत्यांनाही रितेश- जेनेलियाच्या चित्रपटाचे लागले वेड...

मराठमोळा दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख आणि बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुख या स्विट कपलच्या ‘वेड’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Ved: मराठमोळा दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख आणि बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुख या स्विट कपलचा ‘वेड’ हा मराठी सिनेमा ३० डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

चित्रपटातील गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहता आणि ट्रेलरचे व्ह्युज पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली यशस्वी घोडदौड करत आहे.

चित्रपटासोबतच सोशल मीडियावर रितेशने चित्रपटातील 'मला वेड लावलंय' या गाण्याचाही ट्रेंड सर्वांसोबत कमालीचा व्हायरल केला आहे. चित्रपटाला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 'मला वेड लावलंय ' या गाण्याच्या हूक स्टेप वर डान्स करताना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बरेच सोशल मीडिया इन्फ्लूएंसर थिरकताना दिसत आहेत. त्यातच आणखी एका परदेशातील डान्सरलाही या गाण्यावर डान्स करायचा मोह आवरला नाही.

आता या गाण्यावर 'डान्सिंग डॅड' म्हणून प्रसिद्ध असलेला परदेशातील डान्सरही कमालीचा नाचला आहे. एका परदेशी सोशल मीडिया स्टारलाही रितेशने त्याच्या वेड चित्रपटातील 'मला वेड लावलंय' या गाण्याने पुरतं वेड लावले आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जबरदस्त डान्स स्टेप्समुळे प्रसिद्ध असलेल्या रिकी पॉन्डनं हा धमाकेदार व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तो आणि त्याचा मुलगा दोघांनी 'मला वेड लावलंय ' हुबेहूब परफॉर्मन्स करत सर्वांचेच मन जिंकले आहे. अमेरिकेतील वाशिंग्टनचा रिकी पॉन्ड हा सोशल मीडियावर बॉलिवूडमधील गाण्यावर आपल्या परिवारासोबत परफॉर्मन्स करतो इतकेच नव्हेतर त्यांने कोळी गाण्यावर देखील डान्स केला आहे.

रिकी पॉन्ड इंस्टाग्रावर हजारो लोकांप्रमाणेच डान्स व्हिडिओ अपलोड करत असतो. या अगोदर बॉलिवूड वेगवेगळी गाणी निवडून डान्स करत असतो. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला अनेक भारतीय लोकांनी फॉलो केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

SCROLL FOR NEXT