Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Vat Purnima Pooja Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prathamesh Kshitija Vat Purnima : "सात जन्मासाठी नाही तर प्रत्येक जन्मासाठी..."; प्रथमेश- क्षितीजाची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा, लूकची होतेय चर्चा

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Vat Purnima Pooja : अभिनेता प्रथमेश परब याने गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली आहे.. लग्नानंतरचा या कपलचा 'वटपौर्णिमा' हा पहिलाच सण आहे.

Chetan Bodke

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. आजच्या दिवशी पतीला दिर्घायुष्य लाभण्यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. हा सण संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. सेलिब्रिटी मंडळीही हा सण साजरा करताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी कपल्ससाठी ही आजचा सण खूप खास आहे. २०२४ वर्षाच्या सुरुवातीला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. 'टाईमपास' फेम दगडू म्हणजेच प्रथमेश परबनेही फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली आहे.

प्रथमेश परब याने गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतरचा या कपलचा 'वटपौर्णिमा' हा पहिलाच सण आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी क्षितीजासोबत प्रथमेशनेही उपस्थिती लावलेली होती. खास मराठमोळा लूक करत प्रथमेश आणि क्षितीजाने वडाच्या झाडाची पूजा केलेली आहे. क्षितीजाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. खास गुलाबी साडी नेसून क्षितीजा वडाच्या झाडाची पूजा करताना दिसत आहे.

"फक्त सात जन्मासाठी नाही तर प्रत्येक जन्मासाठी प्रथमेश फक्त तूच पाहिजेस, वडाच्या झाडासारखे आपले नाते दीर्घायुषी असावे, जन्मोजन्मी फक्त तुझीच सोबत असावी..., वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा... सौ. क्षितिजा प्रथमेश परब" असं कॅप्शन क्षितीजाने शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टला दिलंय. सध्या क्षितीजाच्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

क्षितीजा घोसाळकर आणि प्रथमेश परबने २४ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली आहे. इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रथमेश आणि क्षितीजाने दोघांनीही एकमेकांना तीन वर्षे डेट केले. डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. क्षितीजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. तर सोबतच ती फॅशन डिझायनर सुद्धा आहे. तर प्रथमेश मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shetty:शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल

Milk & Yogurt : दूध की दही; लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय ?

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT