Ali Abbas Zafar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ali Abbas Zafar : अली अब्बास जफरविरोधात गुन्हा दाखल करा, कोर्टाने का दिले आदेश? नेमकं प्रकरण काय?

Ali Abbas Zafar Fraud Case : 'बडे मियाँ छोटे मियाँ' दिग्दर्शक अली अब्बास जफरवर वासु भगनानी यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

अली अब्बास जफरचा (Ali Abbas Zafar) 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ही कमाल जोडी पाहायला मिळाली. या चित्रपटानंतर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चे दिग्दर्शक अली अब्बास जफरने वासु भगनानीची (Vashu Bhagnani ) फसवणूक केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

अली अब्बास जफर आणि वासु भगनानीच्या या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. हे प्रकरण आता मुंबई न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने वांद्रे पोलिसांना अली अब्बासविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटानंतर निर्माता वासु भगनानी आणि त्यांच्या मुलाने जॅकी भगनाने दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भगनानी यांनी अली अब्बास जफरवर 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटादरम्यान फसवणूक, गुन्हेगारी आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वासु भगनानी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले. यावर आता न्यायालयाने आणखी पुरावे आणि कायदेशीर कागदपत्रे मागवली आहेत.

वासु भगनानी

निर्माते वासु भगनानी हे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. वासु भगनानी पूजा एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसचे संस्थापक आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT