Varun dhawan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan : बॉलिवूडच्या एनर्जिटिक अभिनेत्याला गंभीर आजार, स्वतःच केला मोठा खुलासा

'व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन' या आजाराने वरुण धवन त्रस्त झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Varun Dhawan Latest News: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'भेडिया' चित्रपाटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वरुणने मोठा खुलासा केला आहे. 'जुगजुग जिओ' चित्रपटासाठी कठोर परिश्रम केल्यानंतर त्याला एका आजाराचा सामना करावा लागला होता. 'व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन' या आजाराने वरुण त्रस्त झाला होता.

वरुणने सांगितले की, कोरोनानंतर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर परत आणण्याचा त्यांच्यावर खूप दबाव होता. व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक व्हेस्टिब्युलर डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची बॅलन्स सिस्टिम (तोल सांभाळायची क्षमता) योग्यरित्या कार्य करत नाही.

एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या 'मुंबई कॉन्क्लेव्ह 2022' या कार्यक्रमामध्ये वरुण धवनने त्याच्या आजाराची माहिती दिली. तो म्हणाला, “ज्या क्षणी आपल्यासाठी दरवाजे उघडले, त्याच क्षणी आपण उंदरांच्या शर्यतीत परतलो, असे तुम्हाला वाटत नाही का? येथे उपस्थित असलेले किती लोक आम्ही बदललो आहोत असे म्हणू शकतात? मी पाहतो की लोक आता आणखी मेहनत करू लागले आहेत. खरंतर मी माझ्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटासाठी खूप मेहनत करायला सुरुवात केली होती. तेव्हा मी निवडणुकी लढवत असल्यासारखे मला वाटत होते. मला माहित नाही का पण मी स्वतःवर खूप दबाव टाकत होतो." (Bollywood)

“अलीकडे मी सर्व काही बंद केले आहे. मला काय झालंय हेच कळत नव्हतं. मला व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाचा आजार झाला होता. यामुळे तुमचे संतुलन बिघडते. पण मी जास्त मेहनत केली… या शर्यतीत आपण नुसतेच धावतोय, पण कुणी विचार करत नाही का? मला वाटते की आपण सर्व येथे का आहोत यामागे एक मोठा हेतू आहे. मी माझा हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की तुम्हालाही तो सापडेल.” (Progarm)

वरुण धवनचा 'भेडिया' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासह कृती सेनन देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. अलीकडेच वरुणने त्याच्या चाहत्यांना हॅलोवीन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी भिडेयातील एक नवीन लूक शेअर केला आहे. फोटोमध्ये वरुणचा चित्रपटातील वोल्फ लूक पाहायला मिळाला. (Movie)

'भेडिया' 25 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी यापूर्वी 'स्त्री' आणि 'बाला'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'भेडिया' चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सुद्धा दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

SCROLL FOR NEXT