Varun Dhawan Daughter Saam Tv
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan: वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीला गंभीर आजार; अभिनेत्याने केला खुलासा, आता कशी आहे तब्येत?

Varun Dhawan Daughter: अभिनेता वरुण धवनने नुकतेच उघड केले की, त्याची मुलगी 'लारा' हिला एका आजाराचे निदान झाले आहे. या आजारामुळे तिला चालता येत नाही.

Shruti Vilas Kadam

Varun Dhawan Daughter: अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी २०२४ साली त्यांच्या मुलीचे स्वागत केले. त्यांनी तिचे नाव 'लारा' असे ठेवले. पण आता वरुनने लाराबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. मुलगी ‘लारा’ हिला ‘डेव्हलपमेंटल डिस्प्लेजिया ऑफ द हिप’ (DDH) या विकाराचे निदान झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. आता वरुण धवनने स्वतः तिची प्रकृती कशी आहे ते सांगितले.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना वरुणने सांगितले की, या आजारामुळे लाराला चालायला त्रास होत आहे. तिच्या पायांमध्ये असंतुलन निर्माण झाल्याने तिला चालणे आणि धावणे कठीण जाते. या पार्श्वभूमीवर तिला विशेष वैद्यकीय उपचार देण्यात आले.

वरुणने सांगितले की, उपचार प्रक्रियेचा एक भाग म्हणून लाराला सुमारे अडीच महिने ‘स्पायका कास्ट’मध्ये ठेवावे लागले. हे एक विशेष प्रकारचे प्लास्टर असून, लहान मुलांमध्ये खुब्याच्या (hip) समस्यांवर उपचारासाठी वापरले जाते. कास्ट लावण्यापूर्वी तिला भूल देण्यात आली होती. मात्र, आता कास्ट काढण्यात आला असून, लाराची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती त्याने दिली.

DDHमध्ये मुलाचा खुब्याचा सांधा योग्य प्रकारे विकसित होत नाही. यामुळे पुढे चालताना अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, लवकर निदान झाल्यास या आजारावर उपचार करता येतात, असे वरुणने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, लाराच्या बाबतीत शस्त्रक्रियेची गरज लागली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT