Varun Dhawan Bhediya Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhediya Movie: वरुण धवनचा 'भेडिया' नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; 'या' चित्रपटाची कॉपी केल्याच्या दावा

अभिनेता वरुन धवनच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाला नेटकरी ट्रोल करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. एकीकडे भेडियाच्या या धमाकेदार ट्रेलरचे जोरदार कौतुक केले जातंय, तर दुसरीकडे वरुणच्या 'भेडिया'ची तुलना ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' स्टार राहुल रॉयच्या जुनून या चित्रपटाशी केली जात आहे.

१९९२ मध्ये दिग्दर्शक महेश भट्ट दिग्दर्शित जुनून हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राहुल रॉय, पूजा भट्ट आणि अविनाश वाधवन मुख्य भूमिका साकारत होते. जुनून चित्रपटात एक शापित सिंह विक्रम चौहानला म्हणजेच राहुलला जखमी करतो. त्यानंतर राहुलला संसर्ग होतो आणि तो प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री सिंह बनून दहशत पसरवतो.

वरुण धवनच्या भेडिया चित्रपटच्या ट्रेलरमध्ये तुम्हाला असेच काही पाहायला मिळेल. लांडगा चावल्यानंतर वरुण धवन इच्छाधारी लांडगा बनून जंगलात तांडव करताना दिसतो. या दोन्ही चित्रपटांची स्क्रीप्ट काहीशी मिळती जुळती असल्याने नेटकरी 'भेडिया'ची तुलना राहुलच्या 'जुनून' चित्रपटाशी करत आहेत.

वरुण धवनच्या भेडिया चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने ट्विट करून लिहिले आहे की, 'भेडिया'चा ट्रेलर पाहिल्यानंतर मला राहुल रॉयचा 'जुनून' आठवला, हीच संकल्पना १९९२ मध्ये दिसली होती.

आणखी एका यूजरने 'भेडिया'ची तुलना करत लिहिले की - ३० वर्षांपूर्वी राहुल रॉय सिंह बनला आणि यावेळी वरुण लांडगा, सिंहाऐवजी फक्त लांडगा इतकाच बदल आहे. चित्रपट समीक्षक असलेल्या केआरकेनेही 'भेडिया' 'जुनून'ची कॉपी, असं म्हटलं आहे. २५ नोव्हेंबरला वरुण धवनचा 'भेडिया' चित्रपटगृहात दाखल होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT