'बेबी जॉन' (Baby John) या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी हे स्टार पाहायला मिळत आहे. वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट 180 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. 'बेबी जॉन' 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसापासून चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू दाखवण्यास कमी पडत आहे.
'बेबी जॉन'मध्ये वरुण धवन (varun Dhawan) ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने वीकेंडला ही काही खास कमाई केली नाही. चित्रपटाच्या कलेक्शन आकड्यात सतत घट होताना पाहायला मिळत आहे. 'बेबी जॉन'बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटात सलमान खान चा कॅमिओ देखील पाहायला मिळाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 'बेबी जॉन' चित्रपटाने 11.25 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 4.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 3.65 कोटी कमावले आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'बेबी जॉन' चित्रपटाने रविवारी म्हणजे चित्रपटाच्या पाचव्या दिवशी 4.75 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाची एकूण कमाई 28.65 कोटी रुपये झाली आहे.
'बेबी जॉन'चित्रपटाचे निर्माते अॅटली आहेत. 'बेबी जॉन' हा चित्रपट साऊथच्या 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. आजवर वरुण धवनने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याला पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. मात्र वरुणचा 'बेबी जॉन'चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.