Varun Dhawan
Varun Dhawan Saam Tv
मनोरंजन बातम्या

वरुण धवनवर दुःखाचा डोंगर कोसळला; जवळच्या व्यक्तीचे निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनवर (Varun Dhawan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने आपल्या एका जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. त्यांचा अत्यंत जवळचा ड्रायव्हर मनोज साहू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वरुण त्यावेळी मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मनोजला जवळच्या लीलावती रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

हे देखील पहा -

वरुण धवनला याबद्दलची माहिती मिळताच त्याने रुग्णालयात धाव घेतली. मनोज वरुणच्या अगदी जवळ होते. मनोज वरुणला मेहबूब स्टुडिओत घेऊन गेला, जिथे वरून एका जाहिरातीचे शूटिंग करत होता. अचानक मनोजच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मनोजला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. वरुण स्वत: त्याच्या संपूर्ण टीमसह हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

अचानक घडलेल्या या घटनेने वरुणाला धक्का बसला आहे. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावल्याने वरून फारच दुःखी आहे. मनोज साहू हे फक्त वरूण धवनचेच नाही तर डेव्हिड धवनचे देखील ड्रायव्हर होते. वरूणने जेव्हा अभिनय क्षेत्रात काम करायचं ठरवलं तेव्हा मनोज साहू हे त्याचे ड्रयाव्हर झाले. गेल्या २५ वर्षांपासून मनोज साहू हे धवन कुटुंबाकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी आणि दोन मुलं आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT