Varsha Usgaonkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकर यांनी कोळी समाजाची हात जोडून मागितली माफी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण

वर्षा उसगावकरने कोळी समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल माफीचा व्हिडिओ शेअर करत समस्त कोळी बांधवांची माफी मागितली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकरने(Varsha Usgaonkar) मधल्या वेळात एका ऑनलाईन मासे विकणाऱ्या वेब पोर्टलची जाहिरात केली होती. सध्या त्यासंबंधीत चांगलाच वादंग उसळलेला दिसत आहे. वर्षाने या जाहिरातीत 'बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले' अशी विधान केली आहे. या विधानांवरून मासेमारांनी वर्षा उसगावकरवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. लगेचच वर्षाने माफीचा व्हिडिओ शेअर करत समस्त कोळी बांधवांची माफी मागितली आहे. तसेच कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू ही नव्हता, असे ही ती या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.

वर्षा उसगावकर नेटकऱ्यांच्या पहिल्यांदाच कचाट्यात सापडलेली नाहीत. वर्षा उसगावकर आणि वाद हे गणित नवे नाहीत. वर्षा उसगावकरने प्रसिद्ध संगीतकार रवीशंकर शर्मा(Ravishankar Sharma) यांचा मुलगा अजय शर्मा याच्यासोबत लग्न केले होते. संगीतकार रवीशंकर शर्मा यांनी वर्षा आणि अजय हे दोघेही त्यांचा छळ करत असल्याचा खळबळजनक खुलासा एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर या प्रकरणाविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. वर्षा, तिचा पती आणि सासरे यांच्यातील वाद एवढा वाढत गेला की शेवटी त्यांना न्यायालयाचे दार ठोठवायला लागले होते.

तसेच रवीशंकर शर्मा यांनी त्यांच्या संपत्तीचा वाटा त्या दोघांनाही न देत, आपल्या मृत्युनंतर ही त्या दोघांना बोलवू नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१२ मध्ये रवीशंकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मुलीकडे सोपवले. सासऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांची संपूर्ण संपत्ती वर्षाच्या नंदानी हडपल्याचा आरोप वर्षा आणि तिच्या पतीनं केला होता. तर तिच्या नंदानी आपल्या वडिलांनी त्यांचे राहते घर आपल्या नावावर केले होते. परंतु ते घर भावाने आणि त्याच्या बायकोने हडपल्याचा आरोप केल्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकत संगीतकार रवीशंकर शर्मा यांचे घर त्यांच्या मुलींना देण्याचा निर्णय जाहीर केला होता.

वर्षा उसगावकरचे वडील गोवा राज्याच्या विधानसभेचे उपसभापती होते. वर्षाला अभिनयाची आवड असल्याने तिने लहान वयात मुंबई गाठली. १९९० मध्ये तिने दूरदर्शनसाठी 'राणी लक्ष्मीबाई' या मालिकेत राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. वर्षाने अनेक मराठी नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये काम केले. त्यानंतर वर्षाने बॉलिवूडमध्येही काम केले. वर्षाने शिकारी, साथी, हनीमून, घर जमाई, तिरंगा यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. परंतु मराठीमध्ये ज्याप्रमाणे वर्षाला यश मिळाले तसे यश हिंदी सिनेमात मिळाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईत हिजाब आणि बुरखा विरोधात मनसे आक्रमक

Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

Sakal Media Group Survey : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण; कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरला किती गुण मिळाले?

Hedavi Travel : अथांग पसरलेला समुद्रकिनारा अन् गणेशाचे मंदिर; कोकणातील पर्यटनाची शोभा वाढवते हेदवीचं सौंदर्य

Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

SCROLL FOR NEXT