मुंबई: टीव्ही मालिकेतील (Program)अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने इंदोर येथील तिच्या राहत्या घरी शनिवारी रात्री १२:३० च्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी (Actress) वैशालीने चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये वैशालीने आई-वडील आणि मितेशची माफी मागितली आहे. या चिठ्ठीतून वैशालीच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. जाणून घेऊया काय तिच्या आत्महत्येचे कारण.
वैशालीची डायरी पोलिसांच्या (Police) हाती लागली आहे. ज्यामध्ये तिने राहुल नवलानीचा उल्लेख केला आहे. राहुल वैशालीला गेली बरीच वर्ष त्रास देत होता. जेव्हा वैशालीची सहनशक्ती संपली तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. राहुलचे वडील आणि वैशालीचे वडील मित्र आहेत. गेली १०-१२ वर्ष त्याचे कुटुंब वैशाली तिच्या कुटुंबासह राहत असलेल्या सोसायटीमध्ये राहत आहे.
राहुल आणि वैशाली चांगले मित्र होते. ते दोघे एकत्र जिमला सुद्धा जात असत. वैशालीने सांगितले की दोन-अडीच वर्षांपासून राहुल वैशालीला त्रास देत आहे. त्याविषयी वैशालीने तिच्या घरच्यांना कप्लना देखील दिली होती. घरच्यांना वाटले राहुलशी बोलून ते यावर पर्याय काढतील. शेजारी असल्याने त्यांनी पोलीसात तक्रार केली नाही.
वैशाली आणि राहुल फिरायला गेले होते. त्या ट्रिपमधील काही फोटो राहुलकडे आहेत. त्या फोटोच दबाव टाकून राहुल वैशालीला धमकावत होता. राहुल वैशालीला सतत म्हणायचा की तुझे फोटो सर्वांना दाखवेन, तुझं लग्न होऊ देणार नाही, तुला संसार करू देणार नाही. वैशालीचे एका केनियातील डॉक्टरसोबत लग्न सुद्धा जमले होते. त्याने त्या मुलाला संपर्क करून तिचे लग्न मोडले. आताही वैशाली लग्नाची तयारी करण्यासाठी काम आवरून इंदोरला गेली होती. तिचे कॅलिफोर्नियातील सॉफ्टवेअर इंजिनीयर (Software Engineer) मितेशसोबत लग्न ठरले होते. राहुलने मितेशलाही फोटो पाठवले होते. हे सर्व वैशालीने तिच्या डायरीमध्ये लिहिले होते. राहुलचे लग्न झाले आहे. तसेच त्याला दोन मुले देखील आहेत. तरीही तो वैशालीला त्रास देत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.