Jai Gandhi Share Emotional Post
Jai Gandhi Share Emotional Post Instagram
मनोरंजन बातम्या

Vaibhavi Upadhyay's Fiance Shared Post: तू खूप लवकर निघून गेलीस... वैभवी उपाध्यायच्या आठवणीत जय गांधीने शेअर केली इमोशनल पोस्ट

Pooja Dange

Jay Gandhi Post For Vaibhavi Upadhyay: टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे सोमवारी 22 मे रोजी हिमाचलमध्ये कार अपघातात निधन झाले. दोन दिवसांनंतर अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी इंडस्ट्री आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.

अभिनेता आणि निर्माते जेडी मजेठिया यांनी बुधवारी सकाळी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. यादरम्यान अभिनेत्रीचा होणार नवरा जय सुरेश गांधीही तिच्यासोबत कारमधून प्रवास करत होता. या अपघातात जयचा बचावला. जय सुरेश गांधीने वैभवी उपाध्यायसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

वैभवीचा होणार नवरा जय सुरेश गांधीने इंस्टाग्रामवर वैभवी उपाध्यायसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही रोमँटिक पोज दिली आहे. वैभवी आणि जयने एकेमकांना मिठी मारली असून दोघेही कॅमेराकडे बघून हसत असतात. या फोटोला कॅप्शन देत जयने लिहिले की, "मला दरदरोज प्रत्येक मिनिटाला तुझी आठवण येते. तू अशी जाऊ शकत नाहीस, मी तुला माझ्या हृदयात कायमचे सुरक्षित ठेवीन. तू खूप लवकर निघून गेलीस. RIP माझी गुंडी, आय लव्ह यू"

जयने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'रोड ट्रिपमध्ये तुम्ही स्पीडमध्ये असता असे नेहमीच वाटते, पण तसे नव्हते. आमची गाडी थांबली होती आणि आम्ही ट्रक जाण्याची वाट पाहत होते. मी जास्त बोलण्याच्या स्थितीत नाही, पण मला सांगायचे होते की आम्ही सीट बेल्ट घातला नाही किंवा वेगाने गाडी चालवत होतो असे लोकांनी समजू नये.

वैभवी उपाध्याय हे टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. तिने 'सीआयडी', 'अदालत' 'क्या कसूर है अमला का' सारख्या अनेक शोमध्ये काम केले, पण 'साराभाई वर्सेस साराभाई'मुळे तिला खरी ओळख मिळाली. याशिवाय अभिनेत्रीने 'प्लीज फाइंड अटॅच्ड', 'छपाक' या वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

SCROLL FOR NEXT